अतिक्रमणविरोधी नगरसेवक आक्रमक

By Admin | Updated: January 30, 2016 23:32 IST2016-01-30T23:26:13+5:302016-01-30T23:32:38+5:30

पूर्व प्रभाग सभा : पाणीपुरवठा विभागही धारेवर

Aggressive anti-encroachment corporator | अतिक्रमणविरोधी नगरसेवक आक्रमक

अतिक्रमणविरोधी नगरसेवक आक्रमक

इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी वाढत्या अतिक्रमणविरोधात आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. याशिवाय विस्कळीत पाणीपुरवठ्याबद्दलही प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, सभेत सुमारे २७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.
पूर्व प्रभाग समितीची सभा सभापती शबाना पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नेहमीप्रमाणे सभा कोरमअभावी एक तास उशिराने सुरू करण्यात आली. यावेळी रंजना पवार यांनी जुने नाशिक परिसरात पाणीपुरवठ्याचे नियोजन ढासळले असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. सतीश सोनवणे यांनी सांगितले की, प्रभाग क्रमांक ५३ मधील समांतर रस्त्यालगत असलेल्या हॉटेल साई पॅलेससमोर भूमिगत गटारीचे पाणी वाहत असल्याची तक्रार केली. आरोग्य विभागाने कारवाई केली नाही, तर महापालिका मुख्यालयावर महिलांचा मोर्चा नेण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावरील झाडलेला कचरा, पालापाचोळा जाळून टाकला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याच्या समस्येकडेही सदस्यांनी लक्ष वेधले. नासर्डी नदीपात्रात वाढते अतिक्रमण गंभीर असल्याचे यशवंत निकुळे यांनी सांगितले. सदस्यांकडून अतिक्रमण हटविण्याविषयी तक्रार करूनही कार्यवाही होत नाही. यावेळी विभागीय अधिकारी श्रीमती वसुधा कुरणावळ यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होता. (वार्ताहर)

Web Title: Aggressive anti-encroachment corporator