शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये चार फेऱ्यांनंतरही 11 हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:52 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी चार नियमित फेºया झाल्यानंतरही विविध महाविद्यालयांतील सुमारे सात हजार जागा रिक्त असून जवळपास ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्र्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विशेष प्रवेशफेरी घेण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी शनिवारी (दि. १८ ) गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. 

ठळक मुद्देअकरावी प्रवेशासाठी 11 हजार विद्यार्थ्यांना प्रतिक्षाविशेष फेरीसाठी 18 ऑगस्टला गुणवत्ता यादी

 नाशिक  : अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी चार नियमित फेºया झाल्यानंतरही विविध महाविद्यालयांतील सुमारे सात हजार जागा रिक्त असून जवळपास ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्र्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने विशेष प्रवेशफेरी घेण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी शनिवारी (दि. १८ ) गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विशेष फेरीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक राहणार आहे. अद्याप प्रवेश अर्जच करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली होती. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेचा भाग एक व भाग दोन असे दोन्ही भरले, परंतु, गुणवत्ता याद्यांमध्ये निवड झाली नाही, अशा विद्यार्थ्यांनाही विशेष फेरीपूर्वी पसंतीक्रम बदलण्याची अखेरची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. अकरावीच्या प्रवेशासाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत आतापर्यंत १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून ११ हजार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, प्रवेशासाठी केवळ सात हजार जागा शिल्लक आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. विशेष फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १८ ते २१ आॅगस्टपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेशास जाण्यापूर्वी संकेतस्थळावर जाऊन आपल्या लॉगिनमधून 'प्रोसीड'वर क्लिक करावे. त्यानंतर अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून ती महाविद्यालयात प्रवेशासाठी सादर करावी लागणार आहे.  जागा वाढण्याची शक्यताअकरावीच्या आॅनलाइन प्रवेश विशेष फेरीसाठी सुमारे सहाशे ते साडेसहाशे जागा वाढण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहिल्याने संबंधित विद्यालयांनी त्यांच्या जागा प्रवेशप्रक्रियेच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या असून, विद्यार्थ्यांसाठी आता अधिक सहाशे जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय