शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच

By admin | Updated: August 22, 2014 00:30 IST

निवडणूक आचारसंहिता २५ नंतरच

नाशिक : राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता राजकीय व शासकीय पातळीवर व्यक्त करून त्या दृष्टीने पावले टाकली जात असली तरी, विधानसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे आयोगाने २५ आॅगस्टपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन केलेले असल्यामुळे त्यानंतरच आचारसंहिता लागू होण्याची ठाम खात्री निवडणूक शाखेने दिली आहे.विधानसभा निवडणुकीचे पडघम गेल्या महिन्यापासूनच वाजू लागले असून, खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगानेच तसे संकेत देऊन मतदार याद्यांचे पुनरीक्षण (पान ७ वर)व अंतिम मतदार यादी जाहीर करून यंत्रणेला निवडणुकीच्या कामाला लावले आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे दिल्ली येथे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना निवडणूक पद्धती हाताळण्याबाबत अवगत केले असल्याने कोणत्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार व लोकप्रतिनिधींनीही त्या अनुषंगाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालविली असताना, चालू आठवड्यात आचारसंहिता लागण्याची व्यक्त होणारी शक्यता जवळपास मावळली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने २० ते २५ आॅगस्टदरम्यान प्रत्येक विभागीय पातळीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. निवडणुकीची आचारसंहिता जारी केल्यास त्याच दिवशी व वेळेस प्रत्येक निवडणूक अधिकारी हा मुख्यालयात हजर असला पाहिजे व त्याने तत्काळ आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली पाहिजे असा निवडणूक आयोगाचा दंडक असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आचारसंहिता जारीच केली जाऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव एस. ए. रुदोला, प्रधान सचिव आशिष चक्रवर्ती, आर. के. श्रीवास्तव व राज्य निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार व गुरुवारी पुणे व कोकण या विभागाचे प्रशिक्षण पुण्याच्या यशदा संस्थेत घेण्यात आले. नाशिक व औरंगाबाद या दोन विभागांचे शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस औरंगाबाद येथे प्रशिक्षण असून, रविवार व सोमवारी नागपूर व अमरावती या दोन विभागांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सारेच अधिकारी सोमवारपर्यंत व्यस्त असल्याने तूर्त त्यानंतरच आचारसंहिता जारी होईल, असे ठामपणे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)