शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून

By admin | Updated: January 21, 2017 00:42 IST

जेलरोडला पूर्ववैमनस्यातून कार्यकर्त्याचा खून

नाशिकरोड : जेलरोड त्रिवेणी पार्क येथे शुक्रवारी (दि़२०) रात्री मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ या युवकाचा पूर्ववैमनस्यातून अज्ञात चार-पाच हल्लेखोरांनी तलवार व कोयत्याच्या साहाय्याने वार करून खून केला़ या घटनेमुळे परिसरात दहशत व तणावाचे वातावरण पसरले आहे़  जेलरोड कारागृहाजवळील कॅनॉलरोड भागात राहणारा सुरेंद्र ऊर्फ घाऱ्या शेजवळ (३६) याच्यावर नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात खून, मारामाऱ्या आदि प्रकारचे गुन्हे दाखल आहेत़ २००७ मध्ये दिग्रसकर खूनप्रकरणी सुरेंद्र शेजवळवर खुनाचा गुन्हा दाखल होता़ गत महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याने जुना प्रभाग ३५ व नवीन प्रभाग १८ मधून उमेदवारीही केली होती़ नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सुरेंद्रची आई शांताबाई हिनेदेखील मनसेकडून उमेदवारी केली होती़  गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वीच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेजवळ याने शिवसेनेत प्रवेश केला होता़  शुक्रवारी दिवसभर शिवसेनेच्या इतर इच्छुक उमेदवारांनी नवीन प्रभाग १८ मध्ये नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला होता़ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजवळ व त्यांचा मित्र विक्र म पोरजे हे दोघे अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफई ३२५२) वरून नगरसेवक अशोक सातभाई यांच्या कार्यालयाकडून जेलरोडमार्गे घरी जाण्यासाठी त्रिवेणी पार्ककडे वळाले़ यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात इस्टीम कारने त्यांच्या अ‍ॅक्टिवाला पाठीमागून धडक दिली़ शेजवळ व पोरजे हे दोघेही खाली पडल्यानंतर हल्लेखोर गाडीतून उतरले व शेजवळ पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यास गाठून तलवार व कोयत्याच्या साहाय्याने त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे वार केल्याने तो जागीच ठार झाला़ यानंतर हल्लेखोर फरार झाला़  या हल्ल्याचे वृत्त परिसरात पसरताच घटनास्थळी मोठा तणाव पसरला होता़ पोलिसांनी शेजवळ यास बिटको हॉस्पिटल व त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ यावेळी बिटको व जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमला होता़ रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी माहिती व संशयितांचा शोध घेण्यासाठी तळ ठोकून होते़ (प्रतिनिधी)
खुनाच्या घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदना साठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला़ यावेळी नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़