शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:41 IST

देवळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व विनाकारण रस्त्यावर फिरणाºया वाहनचालकांवर देवळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई ...

देवळा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व विनाकारण रस्त्यावर फिरणाºया वाहनचालकांवर देवळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत चालली असून, सर्व जण काळजीत पडले आहेत. राज्यात आठवडाभरापूर्वी लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देवळा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातदेखील नागरिक कोरोनाविषयी गंभीर असून, शासनाने दिलेल्या तोंडाला मास्क लावणे, हात साबणाने धुणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे आदी नियमांचे पालन करीत आहेत; परंतु या गोष्टीचे गांभीर्य नसलेल्या काही बेफिकीर युवक व नागरिकांना पोलिसांनी काठीचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई केली. पोलिसांनी संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. देवळा येथील पाचकंदील चौकात येणाºया वाहनांची तपासणी करण्यात येत असून, वाहनचालकांना घराबाहेर का पडले याचे कारण विचारले जात आहे. यातून अत्यावश्यक सेवा देणारी तसेच मालवाहतूक करणारी वाहने वगळता इतर वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस