पालिकेकडून कार्यवाही : कोरड्या पात्राला संजीवनी

By Admin | Updated: June 11, 2016 00:02 IST2016-06-10T23:51:41+5:302016-06-11T00:02:58+5:30

रामकुंडात पाणी, भाविकांना पर्वणी

Action from the Corporation: Sanjivani to dry vessel | पालिकेकडून कार्यवाही : कोरड्या पात्राला संजीवनी

पालिकेकडून कार्यवाही : कोरड्या पात्राला संजीवनी

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात महापालिकेने पाणी भरले आणि भाविकांनी घाटावर गर्दी करत स्नानाची पर्वणी साधली. महापालिकेने पात्रात बंधारा टाकत रामकुंडाचा विस्तार कमी केला असून, पाच लाख लिटर्स पाणीसाठवण क्षमतेचे हे पात्र आता कायमस्वरूपी पूर्णपणे भरलेले राहण्यासाठी इंद्रकुंडातून दररोज टॅँकरने पाणी आणून टाकले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गोदापात्र कोरडेठाक पडले आहे. ऐन सिंहस्थ कुंभवर्षात गोदापात्र कोरडे झाल्याने देश-विदेशांतून स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना निराश मनाने माघारी परतावे लागत होते. दशक्रियाविधीसाठी येणाऱ्या लोकांचीही अस्थिविसर्जनासाठी गैरसोय होत होती. त्यामुळे किमान रामकुंडात पाणी कायमस्वरूपी ठेवण्याची पुरोहित संघासह भाविकवर्गाकडून सातत्याने मागणी केली जात होती. महापौरांनी सणावाराला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता खासगी टॅँकरमालकांना रामकुंडात पाणी आणून टाकण्याचे आवाहन केले होते.

Web Title: Action from the Corporation: Sanjivani to dry vessel