शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी परिसरात घडतात रोजच अपघात

By admin | Updated: April 3, 2017 01:30 IST

पाथर्डी फाटा : प्रभाग क्रमांक ३१ मधील संपूर्ण पाथर्डी फाटा परिसरातील विविध रस्त्यांवर होणारे अपघात लक्षात घेता ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 पाथर्डी फाटा : प्रभाग क्रमांक ३१ मधील संपूर्ण पाथर्डी फाटा परिसरातील विविध रस्त्यांवर होणारे अपघात लक्षात घेता ठिकठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही वर्षांत रस्त्यांची दुरुस्ती होऊन ते मोठे झाल्याने वाहन सुसाट वेगाने धावू लागल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाथर्डी फाटा परिसरातील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये कुंभमेळ्याच्या निधीतून व अन्य तरतुदींमधून मुख्य रस्त्यांची व कॉलनी रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पाथर्डी फाटा ते वडनेर गेट, पाथर्डी गाव ते कलानगर, हॉटेल एक्स्प्रेस इन ते पाथर्डी रस्ता, शरयू नागरी ते वासननगर अशा विविध रस्त्यांचे रुंदीकरण व दुरुस्ती झाली आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांवर दिवसभर वाहतूक असते. हे सर्व रस्ते चांगले व मोठे झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अपघातही वाढले आहेत. बऱ्याच घटना पोलीस ठाण्यापर्यंत जात नसल्या तरी अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे पाथर्डी फाटा ते वडनेर गेट दरम्यान मुरलीधरनगरचा भाजीबाजार हॉटेल पामसमोर, हॉटेल नैवेद्यमजवळील चौफुली, निसर्ग कॉलनीचा रस्ता, पाथर्डी गाव वाहतूक बेटाच्या चारही बाजू, एकतानगर, पिंपळगाव खांब फाटा अशा ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता आहे. या रस्त्यावर दुभाजकदेखील आवश्यक असल्याचे नागरिक सांगतात. पाथर्डी गाव ते इंदिरानगर दरम्यान, शरयू नागरी चौफुली, गुरूगोविंदसिंग स्कूल व कॉलेजसमोर गतिरोधकांची गरज आहे. याशिवाय हॉटेल एक्स्प्रेस इन ते पाथर्डी रस्ता दरम्यान आई आश्रम स्वीटजवळ, दामोदरनगर चौफुली, अंजना लॉन्स येथे गतिरोधकांची आवश्यकता आहे. वासननगरच्या काही कॉलनी रस्त्यांवरही गतिरोधकांची आवश्यकता असल्याचे तेथील रहिवाशांचे म्हणणे आहे. ही सर्व ठिकाणे अपघातप्रवण सिद्ध होऊ लागली असून, मोठ्या अपघातांची वाट न पाहता मनपा प्रशासनाने गतिरोधक टाकावेत, अशी मागणी रवि गायकवाड, अंकुश भोर, प्रकाश जाधव, राहुल निकुंभ, दीपक जाधव आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)