मंत्री नितेश राणेंच्या गळ्यात शेतकऱ्याने घातली कांद्यांची माळ, पोलिसांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:39 IST2024-12-24T13:38:45+5:302024-12-24T13:39:51+5:30
नाशिक : कांद्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या निर्यात शुल्कावरून कांदाप्रश्न गाजत असतानाच नाशिक दौऱ्यावर असलेले मत्स्य आणि ...

मंत्री नितेश राणेंच्या गळ्यात शेतकऱ्याने घातली कांद्यांची माळ, पोलिसांची उडाली तारांबळ
नाशिक : कांद्याच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या नाशिक जिल्ह्यात सध्या निर्यात शुल्कावरून कांदाप्रश्न गाजत असतानाच नाशिक दौऱ्यावर असलेले मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना एका शेतकऱ्याने कांद्यांची माळ घातल्याची घटना जिल्ह्यात घडली. या घटनेमुळे पोलिसांचीदेखील धावपळ झाली. मात्र, संबंधित शेतकरी हाती लागला नसल्याचे समजते.
सटाणा तालुक्यातील चिराई येथे एका कार्यक्रमासाठी आलेले मंत्री नितेश राणे हे व्यासपीठावर असताना अनेकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सत्कारासाठी एक शेतकरी व्यासपीठावर चढला आणि त्याने राणे यांच्या गळ्यात थेट कांद्यांची माळ घातली. यावेळी तेथील कार्यकर्ते आणि पोलिसांचीदेखील धावपळ झाली.