शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ६६ उमेदवारांची माघार

By admin | Updated: February 7, 2017 01:03 IST

आज अखेरचा दिवस : रात्री उशिरापर्यंत माघारीबाबतची खलबते

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी सुरू झाली असून, सोमवारी सहाही प्रभागांतून एकूण ६६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यात काही विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. मंगळवारी माघारीचा अंतिम दिवस असून, यावेळी बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अखेरच्या दिवशी माघारीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये उत्साह होता. परंतु राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची यादी घोषित करण्यास विलंब झाल्याने अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत सुमारे दीड हजाराच्या आसपास उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी अर्ज दाखल झालेल्या अर्जांची छाननी शनिवारी करण्यात आली. त्यानंतर सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस माघारीसाठी असून, सोमवारी ६६ उमेदवारांनी माघार घेतली.  नाशिक पश्चिम विभागातून चार उमेदवारांनी माघार घेतली, तर सिडको विभागातून ९ उमेदवारांनी माघारीचे अर्ज दिले. पूर्व विभागात ११ जणांनी माघार घेतली. त्यात १५ क मधून अर्चना थोरात यांचा समावेश आहे, तर पंचवटीतून एकूण १३ जणांनी माघार घेतली, त्यात नगरसेवक रूपाली गावंड तसेच जयश्री धनवटे यांचा समावेश आहे. सातपूर विभागात १२ जणांनी माघार घेतली असून, त्यात नगरसेवक लता पाटील यांचा समावेश आहे. नाशिकरोड विभागातून १७ जणांनी माघार घेतली आहे. मंगळवारी माघारीचा अखेरचा दिवस असून, यादिवशी माघारीसाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षात कमी अधिक प्रमाणात बंडखोरी असल्याने बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सोमवारपासूनच प्रयत्न सुरू झाले असून, साम दाम दंड भेद नितीचा अवलंब करण्यात येत आहे. अनेक उमेदवारांनी बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना राजी करण्याचे प्रयत्न केले. बऱ्याच राजकीय पक्षांनी प्रबळ बंडखोरांना चुचकारण्यासाठी विविध पदांची आमिषे दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अखेरच्या दिवशी राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.