शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी ३० हजार मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:45 IST

जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे साडेचार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती निवडणूक शाखेने केलेली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांतील ४५७९ मतदान केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी विविध आस्थापनेवरील सुमारे साडेचार कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त लागणाºया कामांसाठी किमान पाच हजार चतुर्थश्रेणी कर्मचाºयांचीदेखील नियुक्ती निवडणूक शाखेने केलेली आहे.निवडणुकीसाठी मतदारसंघातील ४४४६ व अंदाजे १३९ सहाय्यकारी मतदान केंद्रांसाठी २७,१९४ इतके अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कर्मचाºयांना वेळोवेळी मतदानप्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रातील कामकाज, ईव्हीएम मशीन, मतमोजणी याबाबतची तांत्रिक माहिती कर्मचाºयांना देण्यात आलेली आहे. कर्मचाºयांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये मागील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मधील अनुभव जसे व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर, सोशल मीडिया, सी-व्हीजील, बेवकास्टिंग, जीपीएस प्रणालीचा वापर याबरोबरच टेस्ट वोट, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा आणि व्हीव्हीपॅट यंत्रणा याबाबतची संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय विधानसभा मतदारसंघानिहाय प्रत्येकी एक याप्रमाणे १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.निवडणुकीसाठी प्रत्यक्ष लागणाºया एकूण कर्मचाºयांपैकी जादा कर्मचाºयांना सामावून घेतले जाते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत निर्माण होणाºया परिस्थितीत कर्मचाºयांची संख्या कमी होणार नाही याची पूर्वतयारी म्हणून अतिरिक्त कर्मचाºयांचे नियोजन केले जाते. जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५६ हजार मयत आणि दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली, तर दुसरीकडे दीड लाख नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आल्यामुळे मतदार यादीतील जवळपास ५० हजार नावांची घट झाल्याचे समोर आले. दरम्यान, अद्याप अडचणीच्या मतदान केंद्रांची निश्चित आकडेवारी करण्यात आलेली नाही. संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ६० मतदान केंद्रे संवेदनशील होती. यामध्ये सर्वाधिक ३३ केंद्रे मध्य विधानसभा मतदारसंघात होती.१५ सखी मतदान केंद्रेप्रत्येक विधानसभानिहाय एक याप्रमाणे एकूण १५ सखी केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांवर केवळ महिलांचीच नियुक्ती केली जाते. महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेल्या गुलाबी रंगाचा वापर अनेक केंद्रांवर महिला कर्मचारी करण्याची शक्यता आहे.४गेल्या लोकसभा निवडणुकीत सखी केंद्रांवरील काही महिला कर्मचाºयांनी गुलाबी साड्या परिधान केल्या होत्या, तर गुलाबी फुग्यांनीदेखील केंद्राचे प्रवेशद्वार सजविण्यात आले होते. यंदाही अशाप्रकारचे केंद्र प्रकर्षाने अभिनव संकल्पना राबविण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय