शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

बिगर आदिवासींसाठी ६ कोटींची मागणी

By admin | Updated: September 7, 2016 01:11 IST

महिला व बालकल्याण विभागाची तयारी : बारा प्रकल्पात मिळणार अंडी अन् केळी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बिगर आदिवासी भागासाठीही अमृत आहार योजना राबविण्याची मागणी झाली. तत्पूर्वीच महिला व बालकल्याण विभागाने बिगर आदिवासी भागातील ३ ते ६ वयोगटातील बालकांना अमृत आहार योजनेच्याच धर्तीवर अंगणवाडीतील बालकांना अंडी व केळी देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ६ कोटी ३९ लाख ३६ हजार रुपयांची मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वीच २५ जुलै २०१६ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीच्या सचिवांना या मागणीबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत २६ प्रकल्प कार्यान्वित असून, आदिवासी क्षेत्रात १४ तर बिगर आदिवासी क्षेत्रात १२ प्रकल्पांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्रातील १४ आदिवासी प्रकल्पांसाठी नियमित व मिनी अंगणवाड्यांमध्ये असलेल्या ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात आदिवासी उपयोजनेतून ३ कोटी ९८ लाख ८२ हजारांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.तथापी बिगर आदिवासी क्षेत्रातील १२ प्रकल्पांतील ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार असल्याने या लाभार्थींना आदिवासी क्षेत्रातील लाभार्थींप्रमाणेच लाभ मिळण्यासाठी ६ कोटी ३९ लाख ३६ हजार ४८० रुपयांची मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातून करण्यात आली आहे. त्यात आठवड्यातून २ दिवस याप्रमाणे वर्षातून ९६ दिवस ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंडी व केळी पुरवठा करण्यासाठी २९३४ अंगणवाड्यांमधील १ लाख ३३ हजार २०१ बालकांना हा लाभ देण्यासाठी ६ कोटी ३९ लाखांची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्णातील बिगर आदिवासी क्षेत्रातील १२ प्रकल्पांसाठी आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांप्रमाणेच वाटप करावयाच्या आहारासाठी यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली आहे. आता जिल्हा नियोजन समिती या मागणीवर काय निर्णय घेते? यावरच बिगर आदिवासी भागातील बालकांच्या ‘अमृतरूपी’ केळी व अंडी या पोषक आहाराचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)