शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

सापगावच्या तरूणाकडील ४६ हजारांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:50 IST

त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँकेत सव्वा अकरा वाजता येथील भरणा करणा-यास आलेल्या सापगाव येथील युवकाची ४५ हजारांची रोकड व १६ हजारांचा मोबाईलची लूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

त्र्यंबकेश्वर : येथील स्टेट बँकेत सव्वा अकरा वाजता येथील भरणा करणा-यास आलेल्या सापगाव येथील युवकाची ४५ हजारांची रोकड व १६ हजारांचा मोबाईलची लूट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तालुक्यातील सापगाव येथील भिमा भास्कर दिवे हा इलेक्ट्रॉनिक दुकानाचा भरणा करण्याकरिता ४५ हजार रूपये घेउन आला होता. यावेळी दोघे अज्ञात भामटे भिमा जवळ आले आणि म्हणाले आमचा देखील दोन लाखाचा भरणा करायचा आहे. आमची स्लीप भरु न देता का ? यावरच न थांबता नव्या रु मालात ठेवलेले नोटांचे पुडके भिमाला दाखविले. भिमा रांगेत उभा होता. त्याबरोबरच त्या दोन किंवा तीन भामट्यानी भिमाकडील ४५ हजार रु पये व मोबाईल मागून घेतला. दोन लाख ज्या पुडक्यात होते. ते पुडके भिमाच्या हातात त्यांनी बँकेत दिले होते. आणि ते भामटे जव्हार फाटा येथील बंद असलेल्या स्टँडकडे चालते झाले. भिमाने हातातील नोटांचे पुडके समाधानाने पाहिले पण त्यात रु मालात नव्या नोटबुकातील नोटांच्या आकाराची पाने कापुन ते रु मालात गुंडाळले होते. भिमा तातडीने बस स्टँडकडे गेला. पण ते पसार झाले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक रविकांत सोनवने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळासह सर्वत्र शोध घेतला मात्र कोणीही आढळले नाही.दरम्यान स्टेट बँकेचे सी सी टी व्ही फुटेज तपासून या भामट्यांचा शोध तपास सुरू आहे.---------------गर्दीचा भामट्यांनी घेतला फायदास्टेट बँक आॅफ इंडिया त्र्यंबकेश्वर शाखेत नेहमीच गर्दी होत असते. येथे तासनतास भरणा करणे पैसे काढणे यासाठी वेळ लागत असतो. कर्मचारी कमी आहेत हे कारण नेहमीच पुढे करण्यात येत असते. याचाच फायदा या सराईत भामट्यांनी घेतला असावा. स्वत: जवळचे कागदाचे तुकडे लाखो रु पये आहेत असे भासवत समोरच्या व्यक्ती कडे देऊन विश्वास मिळवायचा आण िनंतर अलगद डाव साधत पोबारा करायचा ही गुन्हेगाराची पध्दत येथे वापरली आहे. यामध्ये बँकेत संथ गतीने व्यवहार होतात तेव्हा हे भामटे सावज हेरण्यात यशस्वी झाले असावेत.

टॅग्स :Nashikनाशिक