शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के तरुण ‘ब्रेन स्ट्रोक’चे बळी !

By admin | Updated: October 28, 2016 23:17 IST

४० टक्के तरुण ‘ब्रेन स्ट्रोक’चे बळी !

अझहर शेख  नाशिकतारुण्याच्या उंबरठ्यावर असलेले किंवा तारुण्यावस्थेत आलेला मुलामुलींना ज्याप्रमाणे हृदयरोगाचा धोका आहे. त्याचप्रमाणे ‘ब्रेन स्ट्रोक’चाही धोका आहे. जिल्ह्यातील पक्षघाताच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ४० टक्के रुग्ण तरुणवयातील असल्याचा दावा तज्ज्ञांचा आहे. मानसिक ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि व्यसनाधीनता ही यामागची मुख्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहेहृदयरोग आणि पक्षघात यांची कारणे जवळपास सारखी आहे. रक्तामध्ये गाठी होऊन त्या गाठी ज्या अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतील त्या अवयवांना धोका उद्भवतो. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर गुठळ्या तयार होतात सर्वसाधारणपणे या गुठळ्या ह्रदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तामध्ये जास्त आढळतात त्यामुळे ह्रदयरोग होतो; मात्र जेव्हा या गुठल्या मोठ्या किंवा लहान मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये येतात तेव्हा मेंदूला झटका (ब्रेन स्ट्रोक) बसतो आणि पक्षघात (पॅरेलिसीस) होतो. मानसिक ताणतणावामुळे रक्तदाब वाढतो आणि रक्तात गाठी होण्याची शक्यता निर्माण होते. गुटखा, तंबाखू, सिगारेटचे सेवन व मद्यप्राशनामुळे रक्तवाहिन्यांचा आकार कमी होऊन त्या आकुंचन पावण्यास सुरूवात होते. यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊन गाठी जास्त लवकर तयार होतात, असे मेंदूविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  शहरात गेल्या पाच वर्षांमध्ये ‘ब्रेन स्ट्रोक’चा धोका अधिक वाढला आहे. दरवर्षी शहराच्या एकू ण लोकसंख्येमागे शंभर ते दोनशे नागरिकांना पक्षघाताच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस तरुण वयात हा आजार अधिक फोफावत असल्याचे मेंदूविकार तज्ज्ञांचे मत आहे.काय आहे ‘ब्रेन स्ट्रोक’‘ब्रेन स्ट्रोक’ अर्थात पक्षघात. मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन मेंदूला झटका बसतो. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठल्याने किंवा रक्तस्त्राव तसेच रक्तवाहिन्यांना तडा गेल्याने स्ट्रोकसारखा आजार उद्भवतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. मनुष्य अधिक कालावधीसाठी बेशुद्धावस्थेतही जाऊ शकतो. वेळीच योग्य निदान व उपचार न मिळाल्यास व्यक्तीचा मृत्यूही होण्याची शक्यता असते.उत्तम आहार, नियमित व्यायाम केल्यास ‘स्ट्रोक’पासून सुरक्षित राहता येऊ शकते. याबरोबरच तरुणाईने फास्ट-जंक फूड, मद्यप्राशन, धूम्रपान करणे कटाक्षाने टाळावे. मानसिक तणावापासून स्वत:ला दूर ठेवावे.- डॉ. धनंजय डुबेरकर