नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.८) कोरोना बाधित संख्येत ३७१२ तर मृतांच्या संख्येत ३३ ने वाढ झाली. ३२९५ रुग्णांची कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १९४२, नाशिक ग्रामीणमध्ये १६६६, मालेगाव मनपा क्षेत्रात ५६ तर जिल्हा बाह्य क्षेत्रामध्ये ४८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे उपचारार्थी रुग्णांची संख्या ३६२३५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात ३७१२ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 02:11 IST