'कॅट‌्स'चा ३४वा दिक्षांत सोहळा; ३३ लढाऊ वैमानिक देशसेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 02:13 PM2020-12-29T14:13:10+5:302020-12-29T14:22:01+5:30

लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण १३ महिन्यांचा असतो. कॅट‌्स संस्थेची स्थापना १९८६साली करण्यात आली. शिमला येथील आर्मी ट्रेनिंग कमांन्डच्या (एआरटीआरअ‍ेसी) अधिपत्याखाली या संस्थेची यशस्वी घोडदौड ३४वर्षांपासून सुरु आहे.

34th convocation of 'Cats'; 33 fighter pilots enter national service | 'कॅट‌्स'चा ३४वा दिक्षांत सोहळा; ३३ लढाऊ वैमानिक देशसेवेत दाखल

'कॅट‌्स'चा ३४वा दिक्षांत सोहळा; ३३ लढाऊ वैमानिक देशसेवेत दाखल

Next
ठळक मुद्देएव्हिएशन विंग प्रदान दिक्षांत सोहळ्यावर कोरोनाचे सावटप्रशिक्षणाचा कालावधी हा एकूण १३ महिन्यांचा

नाशिक : भारतीय सैन्यदलासाठी लढाऊ वैमानिक घडविणारी प्रशिक्षण संस्था कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट‌्स) ३४व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा मंगळवारी (दि.२९) सकाळी कोरोनाच्या सावटाखाली पार पडला. या तुकडीच्या एकुण ३३ कॅप्टन वैमानिकांना 'एव्हीएशन विंग' वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

दरवर्षी मोठ्या दिमाखात पार पडणारा एव्हीएशन विंग प्रदान दीक्षांत सोहळ्याचा यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लष्करी थाट कमी स्वरुपात अनुभवयास आला. यावेळी चित्ता, चेतक, ध्रुव हेलिकॉप्टर प्रात्याक्षिकेदेखील रद्द करण्यात आली होती. तसेच सैनिकी बॅन्ड पथकाची धूनही यंदा कानी पडली नाही. सकाळी पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील एअरफिल्ड मैदानावर ३३ वैमानिकांच्या तुकडीने सोहळ्याला उपस्थित असलेले जनरल आर्मी एव्हीएशनचे ऑफीशिएटींग संचालक मेजर जनरल अजयकुमार सुरी यांना 'सॅल्यूट' केला. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सुरी यांनी भुषविले. एका खास आकर्षक बग्गीतून सुरी यांचे एअरफील्ड मैदानावर आगमन झाले.अजयकुमार सुरी हे खास बग्गीतून एअरफील्ड मैदानावर दाखल झाले.दरम्यान, त्यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशस्तीपत्रक, विंग देऊन तसेच पाच विजेत्यांना विविध स्मृतीचषक प्रदान करत गौरविण्यात आले.

दरम्यान, युवा लढाऊ वैमानिकांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देत सुरी म्हणाले, ज्ञान आणि कौशल्य हे कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी वैमानिकासाठी महत्वाचे ठरते. कौशल्याचा जोरावर तंत्रज्ञानाचा अचूक वापर जेव्हा केला जातो तेव्हा तुम्ही यशाला गवसणी घालतात. युद्धभूमीवर आपली भूमिका फार महत्वाची असते. भूदालावरील सैनिकांना अत्यावश्यक रसद पुरविण्यापासून आपत्कालीन रेस्क्यूपर्यंत सर्व कामगिरी एका लढाऊ वैमानिकाला चोखपणे पार पाडावी लागते, असा गुरुमंत्रही सुरी यांनी यावेळी आपल्या संदेशात नववैमानिकांना दिला.
...हे वैमानिक ठरले विजेते
तुकडीमधील कॅप्टन संतोषकुमार सोरापल्ली यांनी प्रशिक्षण कालावधीत सर्व श्रेणीत विशेष प्राविण्य मिळविल्याने त्यांना मानाची 'सिल्वर चित्ता' ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच कॅप्टन तारीफ सिंग हे उत्कृष्ट उड्डाणाकरिता दिली जाणारी ह्यकॅप्टन एस.के.शर्माह्ण स्मृती चषकाचे मानकरी ठरले. कॅप्टन प्रभु देवन यांनी ह्यएअर ऑब्जर्वेशन पोस्ट-३५ट्रॉफी पटकाविली. कॅप्टन सचिन गुलीया यांना फ्लेजिंग ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले. कॅप्टन दिवाकर ब्रम्हचारी यांनी उत्कृष्ट गनरचा किताब प्राप्त करत पी.के.गौर चषकावर आपले नाव कोरले.

 

Web Title: 34th convocation of 'Cats'; 33 fighter pilots enter national service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.