शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

३३४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

By admin | Updated: March 2, 2016 23:20 IST

चार कोटी ६२ लाखांचा निधी मंजूर

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी व कीर्तांगळी येथे देवनदीवर कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे होत असून, यामुळे या परिसरातील सुमारे ३३४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर देवनदीचे गोदावरीला वाहून जाणारे पाणी या दोन बंधाऱ्यांमुळे सिन्नर तालुक्यातच अडविण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्यामुळे लघुसिंचन (जलसंधारण) विभागाकडून या दोन बंधाऱ्यांसाठी चार कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वडांगळी येथील बंधाऱ्याची साठवण क्षमता ३०.६० दशलक्ष घनफूट असणार आहे, तर कीर्तांगळी येथील बंधाऱ्यात सुमारे २६.७३ दशलक्ष घनफूट पाणी साठणार आहे. यामुळे सुमारे ३३४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. या कामासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली असून, येत्या शुक्रवारी (दि. ४) या दोन्ही बंधाऱ्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जलसंधारण विभागाने वडांगळी बंधाऱ्यासाठी दोन कोटी ४८ लाख ५७ हजार, तर कीर्तांगळी येथील बंधाऱ्यासाठी दोन कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या दोन बंधाऱ्याचा फायदा वडांगळी, खडांगळी, कीर्तांगळी, मेंढी, चोंढी, निमगाव-देवपूर या गावातील शेतकऱ्यांना होणार आहे. (वार्ताहर)शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धापेठ : येथील जनता विद्यालयासमोरील मैदानावर हौसी शिक्षक क्रिकेटशौकिनांनी नुकत्याच स्पर्धा भरवल्या होत्या. यामध्ये अखेरच्या सामन्यात प्रगती शिक्षक क्रिकेट संघाने एन्नती शिक्षक क्रिकेट संघावर मात करत मालिका ३-२ ने जिंकली़ (वार्ताहर)