3 Sai devotees traveling from Mumbai to Shirdi die in truck accident, one seriously injured | मुंबईहून शिर्डी येथे जाणाऱ्या ३ साई भक्तांचा ट्रक अपघातात मृत्यू, एक जण गंभीर

मुंबईहून शिर्डी येथे जाणाऱ्या ३ साई भक्तांचा ट्रक अपघातात मृत्यू, एक जण गंभीर

ठळक मुद्देयात वैजनाथ चव्हाण (21),सिध्दार्थ भालेराव (22),आशिष पाटोळे(19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले.

सिडको : मुंबईहूनशिर्डीकडे दूचाकीवरून जातांना नाशिक येथील लेखानागर महामार्ग वरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साई भक्तांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य एक साई भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला असून अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 


मुंबई विलेपार्ले येथून शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० ते १५ साई भक्त दुचाकी वरून शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. विल्होळी नाक्याकडून नाशिककडे जाताना सिडकोतील लेखा नगर उड्डान पुल येथे रविवारी ( दि. 3) रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास अज्ञात ट्रकने दुचाकी होडा युनिकॉन एम एच ०२ एफ डी ४२४८ व होंडा डिवो एम एच ०२ एफ एच ६२६ या दुचाकीला उडविले. यात वैजनाथ चव्हाण (21),सिध्दार्थ भालेराव (22),आशिष पाटोळे(19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले. तर अनिष वाकळे (17)गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Web Title: 3 Sai devotees traveling from Mumbai to Shirdi die in truck accident, one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.