शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत महाप्रसादासाठी २५ हजार मांडे

By admin | Updated: March 30, 2017 22:57 IST

संगमेश्वर : आळंदी येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाला खान्देशच्या पुरणपोळीचा (मांडे) प्रसाद सुमारे २५ हजार मांडे घेऊन एक ट्रक येथून रवाना झाला आहे.

संगमेश्वर : आळंदी येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाला खान्देशच्या पुरणपोळीचा (मांडे) प्रसाद सुमारे २५ हजार मांडे घेऊन एक ट्रक येथून रवाना झाला आहे.आळंदी तीर्थक्षेत्रीच्या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तेथे मोठा सोहळा सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यानिमित्ताने लाखो भाविक आळंदी तर्थक्षेत्री जमा झाले आहेत. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशात प्रसिद्ध असलेले खापराच्या पुरणपोळ्या प्रसाद म्हणून या भाविकांना देण्यात येणार आहेत.मालेगाव संगमेश्वरसह तालुक्यातील विविध ग्रामीण भाग, धुळे जिल्ह्यातील फागणे, मुकटी आदि परिसरातील नागरिकांनी गुढीपाडवा सणासाठी घरोघरी पुरणपोळी तयार केल्या. यापुरणपोळी पाडवा सणाच्या रात्री एका विशेष वाहनातून आळंदी क्षेत्री रवाना झाला आहे. भाविकांनी उत्स्फूर्तपणे पुरणपोळ्या आणून दिल्या. संगमेश्वरातील महादेव मंदिराच्या प्रांगणात या पुरणपोळ्या एकत्र करून पुठ्ठ्याच्या खोक्यात भरल्या. जवळपास २५ हजार पुरणपोळ्या गोळा झाल्या. भाविकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविला. एका मोठ्या ट्रकमधून या पुरणपोळ्या संगमेश्वर मालेगाव येथून आळंदीकडे रवाना करण्यात आल्या. आळंदी येथे महाप्रसाद कार्यक्रमात या पुरणपोळ्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला. खान्देशची पुरणपोळी महाराष्ट्रातील भाविकांना खूपच आवडते. म्हणून खास प्रयत्न करून त्या भाविकांना देण्यात आल्याने आम्हाला खूपच समाधान मिळाले असल्याचे या प्रकल्पाचे संयोजक फागणे, ता. जि. धुळे येथील रहिवासी नवल पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)