आळंदीत महाप्रसादासाठी २५ हजार मांडे

By Admin | Updated: March 30, 2017 22:57 IST2017-03-30T22:57:39+5:302017-03-30T22:57:53+5:30

संगमेश्वर : आळंदी येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाला खान्देशच्या पुरणपोळीचा (मांडे) प्रसाद सुमारे २५ हजार मांडे घेऊन एक ट्रक येथून रवाना झाला आहे.

25 thousand mande for Mahanprasad at Alandi | आळंदीत महाप्रसादासाठी २५ हजार मांडे

आळंदीत महाप्रसादासाठी २५ हजार मांडे

संगमेश्वर : आळंदी येथे सुरू असलेल्या धार्मिक सोहळ्याप्रसंगी भाविकांसाठी महाप्रसादाला खान्देशच्या पुरणपोळीचा (मांडे) प्रसाद सुमारे २५ हजार मांडे घेऊन एक ट्रक येथून रवाना झाला आहे.
आळंदी तीर्थक्षेत्रीच्या संस्थेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तेथे मोठा सोहळा सुरू आहे. विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यानिमित्ताने लाखो भाविक आळंदी तर्थक्षेत्री जमा झाले आहेत. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशात प्रसिद्ध असलेले खापराच्या पुरणपोळ्या प्रसाद म्हणून या भाविकांना देण्यात येणार आहेत.
मालेगाव संगमेश्वरसह तालुक्यातील विविध ग्रामीण भाग, धुळे जिल्ह्यातील फागणे, मुकटी आदि परिसरातील नागरिकांनी गुढीपाडवा सणासाठी घरोघरी पुरणपोळी तयार केल्या. यापुरणपोळी पाडवा सणाच्या रात्री एका विशेष वाहनातून आळंदी क्षेत्री रवाना झाला आहे. भाविकांनी उत्स्फूर्तपणे पुरणपोळ्या आणून दिल्या. संगमेश्वरातील महादेव मंदिराच्या प्रांगणात या पुरणपोळ्या एकत्र करून पुठ्ठ्याच्या खोक्यात भरल्या. जवळपास २५ हजार पुरणपोळ्या गोळा झाल्या. भाविकांनी यासाठी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग नोंदविला. एका मोठ्या ट्रकमधून या पुरणपोळ्या संगमेश्वर मालेगाव येथून आळंदीकडे रवाना करण्यात आल्या. आळंदी येथे महाप्रसाद कार्यक्रमात या पुरणपोळ्यांचा प्रसाद वाटप करण्यात आला.
खान्देशची पुरणपोळी महाराष्ट्रातील भाविकांना खूपच आवडते. म्हणून खास प्रयत्न करून
त्या भाविकांना देण्यात आल्याने आम्हाला खूपच समाधान मिळाले असल्याचे या प्रकल्पाचे संयोजक फागणे, ता. जि. धुळे येथील रहिवासी नवल पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: 25 thousand mande for Mahanprasad at Alandi