११ बीआरडीत ऐतिहासिक मिग-२९ होणार अद्ययावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:52 AM2019-09-29T00:52:38+5:302019-09-29T00:54:00+5:30

वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपसोनिक मीग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे अद्ययावतीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.

 2 BRDs to be historic MiG-19 updated | ११ बीआरडीत ऐतिहासिक मिग-२९ होणार अद्ययावत

११ बीआरडीत ऐतिहासिक मिग-२९ होणार अद्ययावत

Next

नाशिक : वायुदलाच्या ताफ्यात १९८६ मध्ये सामील झालेल्या २८व्या स्क्वॉड्रनमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या सुपसोनिक मीग-२९ या ऐतिहासिक लढाऊ विमानाचे ओझर येथील ११ बीआरडी (बेस रिपेअर डेपो) येथे अद्ययावतीकरण आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ससाणा पक्षाप्रमाणे आकाशात उंचभरारी घेतानाही लक्षावर नजर ठेवून अचूक मारा करीत शत्रूला टिपण्याची क्षमता असलेल्या या ऐतिहासिक विमानाची वायुदलात ‘बाज’अशी ओळख असून, या विमानाने शनिवारी (दि.२८) ओझर ११ रिपेअर डेपोच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी आकाशात चित्तथराराक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.
वायुदलाच्या २८ स्क्वॉड्रनच्या मीग- २९ सुपसोनिक विमानाने ग्रुप कॅप्टन जे. एस.पटेल यांच्या नेतृत्वाखाली अखेरचे उडान भरल्यानंतर ओझरच्या धावपट्टीवर उतरण्यापूर्वी सादर केलेल्या कवायतीनी लक्ष वेधून घेतले. हे विमान ११ बीआरडी येथे देखभाल दुरुस्तीसह आधुनिकीकरणासाठी आणण्यात आली आहेत. याठिकाणी मिग -२९ विमानांची कार्यक्षमता सुधारण्यासोबतच त्यांना अद्ययावत करून पुन्हा देशसेवेसाठी सज्ज केले जाणार आहे. या ऐतिहासिक विमानाचे ११ बीआरडी येथे दिमाखदार सोहळ्यात एयर कमोडोर समीर बोराडे यांनी स्क्वॉड्रनचे कमांडर जे. एस. पटेल यांना स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. या सोहळ्यात ओझर येथील वायूसेना स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह एचएएलचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
११ बीआरडीने आतापर्यंत पाचशेहून अधिक लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण करून त्यांना पुन्हा युद्धासाठी सज्ज करून सीमा संरक्षणाच्या दृष्टीने अतुलनीय योगदान दिले आहे. यात एसयू-७, मिग-२३, मिग-२९ आणि एसयू -३०एमकेआय विमानांचा समावेश आहे. याठिकाणी मिग-२९ विमानांचे आधुनिकीकरण १९९६ पासून सुरू झाले असून सद्यस्थितीत येथे मिग-२९ चे आणि एसयू-३० एमकेआय विमानांची देखभाल दुरुस्तीसह त्यांना अद्ययावत करण्यात येत आहे.
मिग २९ अधिक
शक्तिशाली होणार
ओझरे येथे ११ बीआरडीच २८ स्क्वॉड्रनच्या मिग -२९ विमानांच्या लँडिंगसोबतच एका प्रभावशाली युगाचा अंत झाला असला तरी या विमानांनी देशाच्या संरक्षणार्थ वेगवेगळ्या कारवायांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. यात कारगिल युद्धासह पुलवामा हल्ल्यानंतरच्या कारवाईतही या विमानांचा समावेश होता. प्रथम सुपरसोनिक मीग २९- विमान १९८६ मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांचा युद्धजन्य स्थितीत देशाच्या सीमा रक्षणात सिंहाचा वाटा राहिला आहे. आता ही विमाने अद्ययावत करण्यात येत असून यातील शेवटचे विमानाही ११ बीआरडी येथे दाखल झाले आहे.

Web Title:  2 BRDs to be historic MiG-19 updated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.