शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

१५मि.मी : जोरदार सरींनी शहराला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 8:14 PM

शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले.

ठळक मुद्देपावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले गुरुवारी गंगापूर धरण सकाळी ६०.२० टक्के इतके भरले

नाशिक : शहर व परिसराला गुरुवारी (दि.१३) दिवसभर संततधार पावसाने झोडपले. दुपारी दोन वाजेपासून पाच वाजेपर्यंत शहरात जोरदार सरींचा वर्षाव झाल्याने नागारिकांनी समाधान व्यक्त केले. दुपारी तीन ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरा १५ मि.मी इतका पाऊस मोजला गेला. दुपारपासून शहरासह उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरींचे आगमन झाले.शहरात सकाळपासूनच ढगाळ हवामान कायम होते. दुपारनंतर पावसाला शहरासह उपनगरांमध्येही सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या व मध्यम सरींची रिपरिप सुरुच असल्याने नाशिककर ओलेचिंब झाले. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने दिलासादायक हजेरी लावल्याने समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.२ मि.मी इतका पाऊस शहरात मोजला गेला होता. गुरुवारी मात्र या तुलनेत दुप्पट पाऊस झाला. या बारा दिवसांत पहिल्यांदाच शहरात आठ तासांत १५ मिमीपर्यंत पावसाची नोंद होऊ शकलीदिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारी साडेबारा वाजेपासून शहराच्या मध्यवर्ती भागात हलक्या सरींचा वर्षाव सुरु झाला. दुपारी तीन वाजेपासून उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. पुढील दोन तास विहितगाव, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, अशोकामार्ग, द्वारका, वडाळागाव, इंदिरानगर या भागात जोरदार पाऊस झाला. सहा वाजेनंतर संध्याकाळी पावसाचा जोर ओसरला; मात्र ढग कायम होते. दिवसभर झालेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल होता. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जुलैपाठोपाठ आगॅस्टमध्येही अद्याप मुसळधार पाऊ स झालेला नाही. गरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अहल्यादेवी होळकर पूलाखालून केवळ २७८क्युसेस इतके पाणी रामकुंडात प्रवाहित होते. रात्रीपर्यंत नदीच्या पाण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली. पाणलोटमुक्त क्षेत्रात झालेल्या पावसाचे पाणी नदीपात्रात आले होते. दरम्यान दिवसभरात गंगापूर धरण समुमहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. गुरुवारी गंगापूर धरण सकाळी ६०.२० टक्के इतके भरले होते. दिवसभरात धरण समुहाच्या पाणलोटक्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने या साठ्यात शुक्रवारी सकाळपर्यंत अधिक वाढ होणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या सुत्रांनी सांगितले.पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नाही. मनपा प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसweatherहवामानgangapur damगंगापूर धरण