जि.प. आरोग्य सभापतींकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:42 IST2020-06-10T12:42:26+5:302020-06-10T12:42:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले येथील पशुधन विकास अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग ...

Z.P. Review by Health Speakers | जि.प. आरोग्य सभापतींकडून आढावा

जि.प. आरोग्य सभापतींकडून आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे मालेगाव रिटर्न झालेले येथील पशुधन विकास अधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने गावात उपाययोजना करण्यात आल्या. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती जयश्री पाटील यांनी येथील आरोग्य केंद्रात भेट देऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या.
मालेगाव येथील रहिवासी व सारंगखेडा येथे पशुधन विकास अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. त्यामुळे गावात विविध उपाययोजना करण्यात आल्या. या अधिकाºयाच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती जयश्री दीपक पाटील यांनी आरोग्य केंद्राला भेट देऊन प्रभारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला.
या आरोग्य केंद्रात अत्यावश्यक कर्मचाºयांची पदे तीन वर्षापासून रिक्त असून कायमस्वरूपी एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी नेमण्याची गरज आहे. केंद्राच्या इमारतीच्या छताला गळती लागत असल्याने पावसाळ्यापूर्वी त्याची दुरुस्ती करून देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रसूतिगृह, औषध भांडार, प्रयोगशाळा, वैज्ञानिक विभाग, बाह्यरुग्ण आदींचीही जयश्री पाटील यांनी पाहणी केली. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित नसल्याने त्यांच्यामुळे कर्मचाºयांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
या वेळी संजय मोरे, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत चौधरी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, औषध निर्माण अधिकारी परदेशी, वरिष्ठ सहायक कावेरी सोनवणे, आरोग्य सेविका मनीषा रामोळे, ठाकरे, सांगळे, आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Z.P. Review by Health Speakers