जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छागृहींना सुरक्षा साहित्य उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 12:10 IST2020-05-23T12:10:15+5:302020-05-23T12:10:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहीच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार जिल्हा ...

Zilla Parishad provides safety equipment to toilets | जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छागृहींना सुरक्षा साहित्य उपलब्ध

जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छागृहींना सुरक्षा साहित्य उपलब्ध


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामपातळीवर काम करीत असलेल्या स्वच्छाग्रहीच्या सुरक्षिततेसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे जि.प. अध्यक्षा अ‍ॅड.सीमा पद्माकर वळवी यांच्या हस्ते सॅनिटाईझर, मास्क व हॅन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, बांधकाम सभापती अभिजित पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) भूपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) डॉ.वर्षा फडोळ आदी उपस्थित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख व जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून विविध उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविले जात आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढाईत ग्रामपंचायत स्तरावर पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, पंचायत समितीचे सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुका कक्षातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताग्रही सक्रीय झालेले असून त्यांच्यामार्फत ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्तरावर कोरोनाबाबत जाणीव जागृती केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या ग्रामपंचायती व शहराजवळील असलेल्या ग्रामपंचायतीतील एकूण ३१० स्वच्छाग्रही यांच्यासाठी हँन्डग्लोज, सॅनिटाईझर व मास्क वाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या हस्ते नंदुरबार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीतील स्वच्छाग्रहींना सॅनिटाईझर, मास्क व हँन्डग्लोज यांचे वाटप करण्यात आले.


 

Web Title: Zilla Parishad provides safety equipment to toilets