होय, जिल्ह्यात मास्क आणि सॅनेटायझर्सची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:14 IST2020-03-20T12:13:56+5:302020-03-20T12:14:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात हँड सॅनेटायझर, मास्क आणि हँडवॉश यांची टंचाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने मान्य ...

Yes, the shortage of masks and sanitizers in the district | होय, जिल्ह्यात मास्क आणि सॅनेटायझर्सची टंचाई

होय, जिल्ह्यात मास्क आणि सॅनेटायझर्सची टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात हँड सॅनेटायझर, मास्क आणि हँडवॉश यांची टंचाई असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने मान्य केले आहे़ जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे संबधित उत्पादनांचा मालच येत नसल्याचा प्रकार समोर आला असून येत्या काळात यामुळे चिंता वाढणार आहेत़
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार हँड सॅनेटायझर हे जिवनावश्यक वस्तू म्हणून जाहिर झाले आहे़ या पार्श्वभूमीवर हँड सॅनेटायझर, मास्क आणि हँड वॉश यांचा मुबलक पुरवठा होणे गरजेचे आहे़ या उत्पादनांचा पुरवठ्याबाबत पडताळणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ परंतू धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यासाठी एकच औषध निरीक्षक असल्याने त्यांच्याकडून केमिस्ट असोसिएशनची बैठक घेण्याऐवजी पत्रव्यवहार करुन कामकाज करण्यात येत आहे़ या प्रकारामुळे प्रशासनाने जाहिर केलेल्या उपाययोजनांनाच सुरुंग लागत असून जिल्ह्यातील होलसेल आणि रिटेल विक्रेत्यांना हँड सॅनेटायझरच भेटत नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ बाहेरील होलसेल विके्रते नंदुरबारातील विक्रेत्यांना २०० किंवा ३०० पेक्षा बाटल्या देत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षकांकडून सांगण्यात आले आहे़

Web Title: Yes, the shortage of masks and sanitizers in the district