शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात १४ विद्यार्थ्यांचा मृत्यू १० जणांना मिळाले सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूसाठी शासनाकडून ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. गेेल्या दीड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूसाठी शासनाकडून ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. गेेल्या दीड वर्षात जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवून १४ पैकी दहा जणांना सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळवून दिली. दरम्यान, अनेक पालक या योजनेपासून अनभिज्ञ असून त्यामुळे या योजनेचा लाभ त्यांना घेता येत नसल्याची चित्र आहे. याबाबत शाळांनीच अशा प्रकरणांमध्ये पुढाकार घेणे आवश्यक आहे.                    शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने राजीव गांधी अपघात विमा योजना राबविण्यास गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत खाजगी, शासकीय शाळांमधील यु डायसवर नोंदणी असलेले व प्रवेशीत सर्वच विद्यार्थी पात्र असतात. विद्यार्थ्यांकडून कुठलीही रक्कम वसुल केली जात नाही. अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्या विद्यार्थ्यांना ७५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा १४ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव होते. त्यापैकी १० प्रस्ताव मंजुर करण्यात आले. चार प्रस्ताव देखील लवकरच मंजुर करण्यासाठी शिक्षण विभागाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.  

आईच्या बॅंक खात्यावर रक्कमसानुग्रह अनुदानाची रक्कम ही विद्यार्थ्याच्या आईच्या बॅंक खात्यावर जमा केली जाते. जर आईचे बॅंक खाते नसेल तर वडिलांच्या बॅंक खात्यावर ती जमा केली जाते. मुख्याध्यापकांकडून संबधीत मयत विद्यार्थ्याच्या प्रस्ताव आल्यावर तो गटस्तरावरून जिल्हा स्तरावर येतो. आवश्यक प्रक्रिया पार पाडल्यानंतर तो प्रस्ताव शासनाकडे सादर केला जातो. पाठपुरावा करून त्याची रक्कम प्राप्त होते. 

मृत्यूचे कारण       संख्यापाण्यात बुडून        ०५सर्प दंश               ०४अपघाती मृत्यू        ०३ भिंत पडून             ०२अन्य कारणांमुळे     ००    

दीड वर्षात १४  विद्यार्थ्यांचा मृत्यू                                                                                                                                                      १० सानुग्रह अनुदान मंजूर झालेली प्रकरणे         

            या योजनेसाठी एकच सर्वसमावेशक फॅार्म तयार करण्यात आला आहे. त्यासोबत एफआयआर, स्थळपंचनामा यांची प्रत, शवविच्छेदन अहवालाची प्रत आणि मृत्यू दाखला जोडावा लागतो. शिवाय रक्कम जमा होण्यासाठी आईच्या बॅंक पासबुकचीही झेरॅाक्स प्रत सोबत जोडावी लागते. 

                  अपघात विमा योजनेअंर्तगत शाळा व गटस्तरावरून आलेली प्रकरणी लागलीच वरिष्ठ स्तरावर पाठविली जातात. यासाठी शिक्षण विभागाने सर्वसमावेशक अर्ज तयार केला असून त्यातच सर्व माहिती समाविष्ट केली जाते. वेळोवेळी पाठपुरावा करून लवकरात लवकर रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न असतो.  -डॅा.युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी.