वर्षपूर्तीआधीच कोरोनाचे दहा हजार रुग्ण झाले पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:31+5:302021-03-15T04:28:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला १८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्षभरात ...

A year ago, tens of thousands of corona patients passed | वर्षपूर्तीआधीच कोरोनाचे दहा हजार रुग्ण झाले पार

वर्षपूर्तीआधीच कोरोनाचे दहा हजार रुग्ण झाले पार

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याच्या घटनेला १८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्षभरात कोरोनाचा आकडा तब्बल दहा हजार पार गेला आहे तर २३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल ६५ हजार ५७१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यातील ५३ हजार ७३४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात बंद करण्यात आलेले कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू करावे लागले आहे. गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नंदुरबारात कोरोनाचा पहिला रुग्ण १८ एप्रिल २०२० रोजी नंदुरबारात आढळून आला होता. एप्रिल व मे महिन्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. परंतु जून ते सप्टेंबर या तीन महिन्यांत तो अधिक वाढला. त्या काळात जवळपास सहा हजार रुग्णसंख्या झाली होती. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात रुग्णसंख्या मंदावली. या काळात शाळा, महाविद्यालये सुरू झाली. नियम व अटींमध्येही शिथीलता दिली गेली परंतु जानेवारी २०२१ पासून रुग्णसंख्या वाढू लागली. ती मार्चमध्ये सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचली आहे. ११ मार्चल एकूण रुग्णसंख्या ही १० हजार पारदेखील झाली तर आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण आढळून येण्याची घटना १३ मार्चला समोर आली. या दिवशी तब्बल २१४ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात अद्यापही कमी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे दिलासा आहे.

जिल्ह्यात पाच ठिकाणी कोरोना उपचार कक्ष...

जिल्ह्यात पाच ठिकाणी कोरोना उपचार कक्ष सुरू आहेत. त्यात नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालय व तापी वसतिगृह. शहादा येथे एक, नवापूर येथे एक व तळोदा येथे एक उपचार कक्ष सुरू आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या कक्षात पुरेसे ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाचा आहे. खासगी रुग्णालयांमध्येही पुरेसे बेड उपलब्ध आहेत.

जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध...

जिल्ह्यातील सर्व कोविड उपचार कक्षांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. रेमडिसिव्हर इंजेक्शनही पुरेशा प्रमाणात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय शहादा व नंदुरबार येथील खासगी उपचार करणाऱ्या रुग्णालयातदेखील आवश्यक त्या सुविधा आहेत.

जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा नंदुरबारात आढळून आला होता. या रुग्णाच्या घरातील इतर तीन सदस्यदेखील बाधित होते.

नंदुरबारनंतर शहादा येथे रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाला होता.

Web Title: A year ago, tens of thousands of corona patients passed