शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

भावभक्तीत आदिशक्तीची आराधना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बहुप्रतिक्षेतील नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून  तरुणाई, महिला भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. भक्तीमय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बहुप्रतिक्षेतील नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून  तरुणाई, महिला भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. भक्तीमय वातावरणात आदिशक्तीची विशेष आराधना करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातील विविध गरबा मंडळांमार्फत भरीव कार्यक्रम घेण्यात आले.  अतिवृष्टीसह सतत होणा:या पावसामुळे सहसा बाहेर न पडलेले नंदुरबार जिल्ह्यातील भाविक शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त बाहेर पडू लागले आहे. पितृपक्ष असला तरी विविध साहित्य खरेदीसाठी नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला शनिवार व रविवार दुपारी भाविकांनी बाजारात गर्दी केली होती. दरम्यान भाविकांमार्फत विविध प्रकारचे दिवे, केरसुणी, टोपली, फुले व अन्य साहित्य खरेदी करण्यात आली. त्यामुळे बाजारात तब्बल 15 दिवसांनी प्रथमच मोठी उलाढाल झाली. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्रात असला तरी या जिल्ह्याचा प्रशासकीय वगळता अन्य सर्वच दृष्टीने गुजरातशीच अधिक संबंध येतो. नवरात्र व गरबा या बाबतीतही हेच संगता येतील. गणेशोत्सवनंतर नवरात्रोत्सवाचे वेथ लागले होते. अशा बहुप्रतिक्षेतील उत्सवाला रविवारी सुरुवात झाली. तरुणाईपाठोपाठ दुर्गा मातेच्या भाविकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे. या उत्सवासाठी नंदुरबार शहरात विविध गरबा मंडळांमार्फत दिवसभरात सजावटी कामे पूर्ण करण्यात आली. त्यात अंबिका गुजराती मंडळ, रघनाथ गरबा सराफ बाजार गरबा मंडळ यांच्यासह अन्य मंडळांचा समावेश आहे. अंबिका गुजराती मंडळातर्फे रात्री नऊ वाजता माता मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र वाघेला. उपाध्यक्ष नितीन सोनी, सचिव विरल वाडीया, किर्ती सोलंकी, मोज सोलंकी, कार्तिक दोषी, वसंत गोईल, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. या मंडळामार्फत डि.जे.विना हा उत्सव साजरा केला जाणार आहे. केवळ महिला व बालकांसाठी फॅन्सी व अन्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर रघनाथ मंडळामार्फत मंगल भवनात नऊ दिवस महिलांसाठी गरब्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुबोध वाणी, डॉ.अनिल शाहा, सचिव अंकलेश शाह, पियुषकुमार शाह, रजनीकंत वाणी हे परिश्रम घेत आहे. सराफ बाजार गरबा मंडळामार्फत नीना सोनी, भूमी सोनार, नुपूर श्रॉफ, उर्वी सोनार, सोनल सोनार, मनाली सोनार, मिनल सोनार, सुनयना  सोनार, सुवर्णा सोनार, राजश्री सोनार यांच्यासह 30 जणांचा ग्रुप तयार करण्यात आला आहे. या मंडळातर्फे दररोज गरबा नृत्य करण्यात येत  आहे.