शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या पायथ्याशी रंगीबेरंगी फुलपाखरांची दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 13:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर :  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा वनक्षेत्रातील वनराईत नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी फुलपाखरे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर :  सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अक्कलकुवा वनक्षेत्रातील वनराईत नैसर्गिक सौंदर्यात भर घालणारी फुलपाखरे सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. गंगापूर रोपवाटिका, कुंडलेश्वर तसेच परिसरात असंख्य फुलपाखरांची जत्राच भरत असल्याचे दिसू आले आहे. यात प्रामुख्याने आकर्षक ब्लू टायगर, कॉमन क्रो, प्लेन टायगर, ब्लू मॉर्मन, मोनार्क, काळू, ग्रास यलो यासारख्या नैसर्गिक रंगीबेरंगी मनमोहक अशा विविध प्रजातींच्या फुलपाखरांचा वावर सुरू झाला आहे. या भागातील विविध फुलझाडांवर ही फुलपाखरे भिरभिरताना दृष्टीस पडत आहे. अक्कलकुवा शहरालगत असलेल्या गंगापूर रोपवाटिका, कुंडलेश्वर वनराई परिसर, सोजडान परिसरात पावसाळा संपताच रंगीबेरंगी विविध प्रजातींची आकर्षक फुलपाखरे जास्वंद, बकुळी, बहावा, पानफुटी, कढीपत्ता, बेल, चुना वनस्पती तसेच पावसाळ्यानंतर तग धरून असणाऱ्या रानभाज्यांच्या झुडपांवर भिरभिरताना दिसत आहे. फुलांवर दिसणारी ही फुलपाखरं झाडाझुडपांचे होस्ट प्लांट म्हणून वापर करतात. यातून झाडांवर त्यांचे वास्तव्य वाढून विविध नैसर्गिक रंगछटा आकर्षित करतात. विशेष बाब म्हणजे फुलपाखरे स्वच्छ वातावरणचे प्रतीक मानली जातात. यामुळे या भागातील हवा ही अधिकाधिक शुद्ध झाल्याचे समजून येत असल्याचे वनअभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.वनविभागाचे लक्ष  याबाबत अक्कलकुवा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सोनाली गिरी यांना संपर्क केला असता,  आढळून येणारी फुलपाखरे नैसर्गिक देण आहे. यातून हा परिसर सर्व प्रकारच्या जिवांसाठी राहण्यास उपयुक्त असल्याचे स्पष्ट होते. जैवविविधेत भर घालणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेचा वनविभाग सातत्याने अभ्यास करून त्याचे संवर्धन करत आहे. असे त्यांनी सांगितले.