नंदुरबार येथे जागतिक अहिराणी भाषा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST2021-03-13T04:56:02+5:302021-03-13T04:56:02+5:30

नंदुरबार : कान्हदेश कला अकादमीच्या नंदुरबार येथील शाखेतर्फे जागतिक अहिराणी भाषा दिन साजरा करण्यात आला. खान्देश पुत्र लोककल्याणकारी राजा ...

World Ahirani Language Day celebrated at Nandurbar | नंदुरबार येथे जागतिक अहिराणी भाषा दिन साजरा

नंदुरबार येथे जागतिक अहिराणी भाषा दिन साजरा

नंदुरबार : कान्हदेश कला अकादमीच्या नंदुरबार येथील शाखेतर्फे जागतिक अहिराणी भाषा दिन साजरा करण्यात आला.

खान्देश पुत्र लोककल्याणकारी राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त जागतिक अहिराणी भाषा दिवस संपूर्ण विश्वात यावर्षीपासून साजरा करण्यात यावा, असा ठराव उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचालित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन आयोजित पहिल्या ऑनलाईन विश्व अहिराणी साहित्य संमेलनात पारित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ११ मार्च हा दिवस जगभरात ‘जागतिक अहिराणी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. नंदुरबार येथे लोकमान्य टिळक वाचनालयात नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा साहित्यिक रमाकांत पाटील यांच्या हस्ते लोककल्याणकारी राजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी साहित्यिक निंबाजीराव बागूल, एन. टी. पाटील, लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रवीण पाटील, नाट्यकर्मी मनोज सोनार, राजेश जाधव, कान्हदेश कला अकादमीचे सहकार्यवाह तथा नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर आदी उपस्थित होते. प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला साहित्यिक निंबाजीराव बागूल यांनी ‘अहिराणी मनी माय’ ही अहिराणी कविता सादर केली तर एन. टी. पाटील यांनी अहिराणी भाषेचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक नागसेन पेंढारकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.

Web Title: World Ahirani Language Day celebrated at Nandurbar