खापर महाविद्यालयात बौद्धिक स्वामीत्व हक्क व वाङ्‌मयचौर्य विषयावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST2021-07-10T04:21:54+5:302021-07-10T04:21:54+5:30

यावेळी पुणे येथील माजी शास्त्रज्ञ एन.सी.एल. डॉ.नंदकुमार दहीभाते यांनी बौद्धिक स्वामीत्व हक्क या विषयावर तर डॉ.यू.एस. जाधव यांनी वाङ्‌मयचौर्य ...

Workshop on intellectual property rights and plagiarism at Khapar College | खापर महाविद्यालयात बौद्धिक स्वामीत्व हक्क व वाङ्‌मयचौर्य विषयावर कार्यशाळा

खापर महाविद्यालयात बौद्धिक स्वामीत्व हक्क व वाङ्‌मयचौर्य विषयावर कार्यशाळा

यावेळी पुणे येथील माजी शास्त्रज्ञ एन.सी.एल. डॉ.नंदकुमार दहीभाते यांनी बौद्धिक स्वामीत्व हक्क या विषयावर तर डॉ.यू.एस. जाधव यांनी वाङ्‌मयचौर्य या विषयावर व्याख्यान केले. राष्ट्रीय ऑनलाइन चर्चासत्रात कवयित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे कुलगुरू प्रा.ई.वायूनंदन, सहसंचालक डॉ.सतीश देशपांडे, प्र.कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार, प्र.कुलसचिव एस.आर. भदलीकर, दिलीप पाटील, डॉ.अनिल चिकाटे यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

सूत्रसंचालन प्रा.एम.पी. सूर्यवंशी तर आभार प्रा.डॉ.आर.डी. चौधरी यांनी मानले. चर्चासत्रासाठी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य प्रदीपकुमार घंटे यांनी प्राचार्य डॉ.बी.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील आयोजन समिती सदस्य डॉ.व्ही.बी. माळी, डॉ.जी.पी. पाठक, प्रा.एस.पी. बैसाणे, प्रा.डी.टी. सूर्यवंशी, प्रा.एन.एस. तडवी यांनी परिश्रम घेतले. तर तांत्रिक सहायक म्हणून प्रा.डाॅ.राहुल देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Workshop on intellectual property rights and plagiarism at Khapar College