शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पायपीट करत आलेल्या मजूरांना मिळाला ओलावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : गुजरातमध्ये मजुरी करण्यासाठी गेलेले शेकडो मजूर मंगळवारी गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दाखल झाले होते़ पायपीट करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : गुजरातमध्ये मजुरी करण्यासाठी गेलेले शेकडो मजूर मंगळवारी गुजरात-महाराष्ट्र सीमेवर दाखल झाले होते़ पायपीट करत आलेल्या मजूरांची अंबाबारी गावाजवळ प्रशासनाने सोय करुन येथे तपासणी केली होती़ येथून या मजूरांना लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी माणूसकीचे दर्शन घडवत वाहनाद्वारे घरी सोडले़गुजरात राज्याच्या विविध भागात अडकून पडलेले ६६२ मजूर आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत सकाळी जिल्ह्याच्या सीमेवर आले होते़ मंगळवारी दाखल झालेल्या या मजूरांची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार विजय कछवे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी तातडीने गुजरात सीमा गाठली होती़ येथून बहुतांश मजूर नजीकच्या आंबाबारी येथील देहली प्रकल्प परिसरात दाखल झाले होते़ या मजूरांना त्यांच्या गावी पोहोचते करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते़ यावेळी शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनीही येथे भेट देत मजूरांची माहिती घेतली होती़जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर उपस्थित असलेल्या ६६२ मजूरांवर डॉ़ योगेश देशमुख व डॉ़ स्वप्नील सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य पथकाने तपासण्या पूर्ण केल्या होत्या़ सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरु होते़ येथे उपस्थित असलेले बहुतांश मजूर तळोदा तालुक्यातील होते़ तर काही मजूर हे अस्तंबा ,चांदसैली, कालीबेल ता़ धडगाव या परिसरातील होते़मजूरांची आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी चौकशी करत विचारपूस केली होती़दरम्यान गुजरात राज्यात अडकून पडलेल्या शेकडो मजूरांना तेथील कारखानदार विविध वाहनांमधून महाराष्ट्र सीमेपर्यत सोडून जात असल्याची माहिती समोर आली आहे़ येत्या दोन दिवसात अजूनही काही जत्थे येण्याची शक्यता आहे़आमदार राजेश पाडवी यांच्यासह तालुका प्रशासनाने ४० च्या जवळपास वाहने तयार करुन दुपारनंतर मजूरांना त्यांच्या कुटूंबियांसह रवाना करण्यास सुुरवात केली होती़ पायपीट करुन आलेल्या मजूरांसोबत लहान मुले ही होती़ या मुलांना खापर आणि अक्कलकुवा येथील सेवाभावी नागरिकांनी दुपारी जेवण देत सोबत कोरडा शिधाही बांधून दिला होता़ तळोदा आणि धडगाव तालुक्याच्या विविध भागात जाणाºया मजूरांना वाहनांमध्ये सोडण्यापूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची काळजी याची माहिती तालुका प्रशासनातील अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून देण्यात आली़ सायंकाळी उशिरा ही वाहने मार्गस्थ झाली होती़ तळोदा तालुक्याच्या विविध गावांमध्ये हे मजूर रात्री उशिरापर्यंत पोहोचले़तपासणी करण्यात आलेल्या सर्व मजूरांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारुन त्यांना पाठवण्यात आले़ त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना आहेत़दुपारी आमदार पाडवी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची व्यवस्था करुन दिल्यानंतर उपस्थित मजूरांचा आनंद गगनात मावत नव्हता़प्रशासन आणि वैद्यकीय पथक यांनी आलेल्या प्रत्येक मजूराची व्यवस्थितपणे नोंद केली आहे़ परत पाठवलेल्या मजूरांना गुजरातमधील कारखानादारांनी मजूरी देण्यासह अन्न पाण्याचीही योग्य व्यवस्था केली नसल्याची माहिती समोर आली आहे़