शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

महामारीतही रोहयोवरील मजूर असुरक्षीतच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:24 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मजुरांना काम देण्याबाबत प्रशासनाने तत्परता दाखवून आघाडी घेतली असली तरी मनरेगाच्या कामावर काम करणारे मजूर मात्र सद्याच्या महामारीच्या काळात असुरक्षीतच असल्याचे चित्र आहे. मजुरांच्या कामाच्या ठिकाणी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ना प्रथमोपचार पेटी, ना पाळणार घर ना सॅनिटायझर. सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतली जात नसल्याने तो एक धोक्याचा संकेत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले जवळपास ४० हजारापेक्षा अधीक मजूर जिल्ह्यात परतले आहेत. सद्याच्या स्थितीत सर्वच कामे बंद असल्याने मजूरही रिकाम्या हाती बसले आहेत. अशा स्थितीत प्रशासनाने मनरेगा वरील कामांना प्राधान्य दिले असून ४१८ गावात कामे सुरू केली आहेत. त्यावर जवळपास ३० हजार मजुरांना काम दिले आहे. या मजुरांना पहिल्या टप्प्यातील ३ कोटी ९३ लाख रुपये वेतन देण्यातही आले आहे. या कामांची स्थिती पहाता सद्या तरी राज्यात पाचव्या क्रमांकावर जिल्हा आहे.हे काम जरी समाधानकारक असले तरी प्रत्यक्षात मात्र कामाच्या ठिकाणी मजुरांची कुठलीही सुरक्षा व्यवस्था व काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येते. या बाबत नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यातील काही कामांवर फेरफटका मारला असता त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, लहान मुलांसाठी पाळणाघर आवश्यक आहे परंतु रखरखत्या उन्हातही तशी व्यवस्था नाही. काम करतांना मजुरांना दुखापत झाल्यास प्रथमोपचार पेटी आवश्यक असते. पण त्याचीही व्यवस्था नाही. आजच्या स्थितीत कोरोना रोखण्यासाठी प्रशासन सर्वांनाच सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देते पण रोहयोवरील कामांवरील मजुरांना मात्र ती सुविधा नाही.याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे परराज्यातून मजूर परतत आहेत तसे त्या मजुरांची प्राथमिक तपासणी करून १४ दिवस घरातच क्वॉरंटाईन केले जात आहे. मात्र रोहयोच्या कामांवर असे शिक्के असलेले मजूरही दिसून आले.एकुणच नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त होत आहे. रुग्णालयातील उपचार घेणारे सर्व रुग्ण बरे झाल्याने ती एक दिलासादाय बाब आहे. अशा स्थितीत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मनरेगाच्या कामांवरील मजुरांकडे अधीक लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याने प्रशासनाने त्याकडे गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.सद्याची परिस्थिती पहाता मजुरांना सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था आवश्यक आहे. शिवाय पाणी, प्रथमोपचार पेटी व पाळणाघरांच्या सुविधांबाबत सुचना यापूर्वीच केल्या आहेत. यासंदर्भात पुन्हा सर्वांना नव्याने सुचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहोत. तसेच क्वॉरंटाईन केलेले मजूर कामावर येणार नाहीत याची काळजी घेण्याची सुचना सरपंच व पोलीस पाटलांना देण्यात येणार आहे.-अनिकेत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगा, जि.प., नंदुरबार.