CoronaVirus: चार तासांच्या चर्चेनंतर मजुरांना राज्यात प्रवेश; प्रशासनाची धांदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:40 IST2020-04-29T05:39:55+5:302020-04-29T05:40:16+5:30

महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला.

Workers enter the state after four hours of discussion; The rush of administration | CoronaVirus: चार तासांच्या चर्चेनंतर मजुरांना राज्यात प्रवेश; प्रशासनाची धांदल

CoronaVirus: चार तासांच्या चर्चेनंतर मजुरांना राज्यात प्रवेश; प्रशासनाची धांदल

रमाकांत पाटील 
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे गुजरातमध्ये अडकून पडलेले सुमारे एक हजारांपेक्षा अधिक मजूर मंगळवारी अचानक महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. या मजुरांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा की नाही याबाबत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला. दरम्यान, या सर्व मजुरांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून दरवर्षी २५ हजारांपेक्षा अधिक मजूर गुजरातमध्ये रोजगारासाठी हंगामी स्थलांतरित होतात. ते सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये जातात व मार्चनंतर टप्प्याटप्प्याने गावी परततात. संचारबंदीत मजुरांना अनेक अडचणी होत्या. त्याचे व्हिडीओ त्यांनी त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांना पाठवले. त्यावर महाराष्टÑ शासनाने देखील गंभीरपणे विचार सुरू केला होता. मंगळवारी सकाळी अचानक मजूर सीमेवर येताच पोलीस व महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. काही अधिकाºयांनी त्यांनी गुजरातमध्ये पुन्हा जाण्यासाठी प्रयत्न केला. पण गुजरात प्रशासनाने नकार दिला. हा विषय थेट पालकमंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यापर्यंत गेला. चर्चेनंतर या मजुरांना महाराष्टÑाच्या सीमेत येऊ देण्याचा निर्णय झाला.
र्>आरोग्य तपासणी : मजुरांची आमलाड (ता़ तळोदा) येथे वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन त्यांना गावाकडे रवाना करण्यात आले.
>गुजरात व मध्य प्रदेशातून वाहनाने येणाºया कुठल्याही व्यक्तीला जिल्ह्यात परवानगी नाही. जे लोक पायी येत आहेत त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना स्थानिकांकडून घरी सोडण्यात येत आहे. मानवतेच्या भूमिकेतून पायी चालत आलेल्या लोकांची तपासणी करून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. - डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार

Web Title: Workers enter the state after four hours of discussion; The rush of administration