शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षापासून पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तिधारे गावाजवळील लाखो रूपये खर्चाच्या मोठ्या पुलाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा तालुक्यातील लोहारा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या तिधारे गावाजवळील लाखो रूपये खर्चाच्या मोठ्या पुलाचे बांधकाम गेल्या तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. तसेच शेजारच असलेल्या नाल्यावरील पुलदेखील गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्याने तिधारे गावाचा परिसराशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थ वाऱ्यावर आहेत. पुलाचे अपुरे बांधकाम व नदीतील मोठ-मोठे ढिगारे ‘जैसे थे’ असल्याने गावाला पुराचा धोका निर्माण झाल्याने आदिवासी ग्रामस्थ भयभित अवस्थेत आहेत. तिधारे गावाचा हा गंभीर प्रश्न असताना लोक प्रतिनिधी व प्रशासन कमालीचे सुस्त असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.दरम्यान तिधारे पुलाचे निकृष्ट बांधकाम अपूर्णावस्थेत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी होवून ठेकेदारासह संबंधित बांधकाम अधिकाºयावर कठोर कारवाई करावी, अन्यथा गावात पाणी शिरल्यास पुरातच उड्या मारून आत्मदहन करण्याचा इशारा आदिवासी बांधवांनी दिला आहे.याबाबत असे की, शहादा तालुक्याच्या पूर्वेकडील ४०० ते ५०० आदिवासी लोकवसाहतीचे तिधारे हे गाव लोहारा गृप ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. तिधारे येथे ये-जा करण्यासाठी लोहारा, असलोद, गोगापूर व दामळदा या चारही गावाकडून स्वतंत्र रस्ते आहेत. मात्र या चारही मार्गावर दोन मोठे नाले व मंदाणे कडून गोमाई नदीला जावून मिळणारी मंदाकिनी नदी आहे. नाल्यांवरील पुलाचे काम गेल्या वर्षी झाले. मात्र या पुलाचे काम गेल्या वर्षाच्या पहिल्याच पावसात वाहून गेले. अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने निकृष्ट काम झाल्याने पुलाचे तीन तेरा वाजले.पावसाळा वगळता अन्यवेळी नदीला पाणी कमी राहते. त्यामुळे नदीतून दुचाकी वाहनेही जावू शकत नाही. शुक्रवारी रात्री मंदाणे परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. या वेळी तिधारे पुलाजवळ पाणी पुढे जाण्यास दगड व मातीच्या ढीगाचा अडथळा ठरत असल्याने या नदीतील पाणी काठांवरील घरांमध्ये शिरून संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नदी जवळच असलेल्या शेतात बांधलेल्या घोड्याचेही पुराच्या पाण्यामुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.पिंपर्डे, लोहारा, तिधारे, दामळदा व खेतियाकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग असून, तिधारे गावाला लागूनच असलेल्या मंदाकिनी नदीवर लाखो रूपये खर्चाच्या पुलाचे काम मंजूर होवून ते प्रत्यक्षात सुरू झाले. पिलरही उभे राहिले. मात्र पुढील काम कशामुळे रखडले? यास जबाबदार कोण? याचीही चौकशी या निमित्ताने होणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुलाचे बांधकाम अपूर्णावस्थेत असून, नदीच्या मुख्य पात्रातच मोठ-मोठे दगड व मुरूमाचे ढीग असल्?याने पाणी पुढे प्रवाहीत होण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून पुराचे पाणी पुढे प्रवाहीत न होता गावात शिरते. रात्रींबेरात्री पाणी गावात व घरात शिरून संसारोपयोगी साहित्यासह इतरही नुकसान होत असते. यंदाच्या वर्षी तर काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अपेक्षा फोल ठरली.