महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला बचतगटांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST2021-01-09T04:26:10+5:302021-01-09T04:26:10+5:30

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावात कोरोनाकाळात गटाद्वारे चालवण्यात येणाऱ्या धान्य बँकेद्वारे ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नव्हते, अशा कुटुंबांना धान्य, ...

Women's Self Help Groups honored by Women's Economic Development Corporation | महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला बचतगटांचा सन्मान

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे महिला बचतगटांचा सन्मान

अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावात कोरोनाकाळात गटाद्वारे चालवण्यात येणाऱ्या धान्य बँकेद्वारे ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नव्हते, अशा कुटुंबांना धान्य, किराणा व आनुषंगिक साहित्य देण्यात आले. त्या गटाच्या प्रतिनिधी म्हणून कनिस बी, कमलाबाई याचा सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय संगेकर तर अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती व दिशा समितीच्या सदस्य बबिता नाईक उपस्थित होत्या. त्याच्या सोबत लोक संचालित साधन केंद्राच्या राज्यपातळीवरील जिल्हा प्रतिनिधी मंगला नाईक, माविमचे सनियंत्रण अधिकारी मिलिंद पाटील उपस्थित होते. यावेळी गावातील विविध गटांच्या महिला सदस्य उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ज्योती वळवी यांनी केले. आभार सुभद्रा वळवी यांनी मानले.

Web Title: Women's Self Help Groups honored by Women's Economic Development Corporation