शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री जन्मा तुझी कहाणी लॉकडाऊनमध्येही नयनी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 12:32 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कुटूंब एकत्र आले, कुटूंबातील व्यक्तींमधील जिव्हाळा वाढल्याचे चित्र ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे कुटूंब एकत्र आले, कुटूंबातील व्यक्तींमधील जिव्हाळा वाढल्याचे चित्र एकीकडे असतांना दुसरीकडे पती-प}ींमधील दुरावा व भांडणे देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनपासून  म्हणजेच 23 मार्चपासून 10 एप्रिलर्पयत अर्थात 19 दिवसात पोलीस  विभागाच्या महिला सेलकडे 11 महिलांनी तक्रारी अर्ज केले आहेत. कुटूंबात किंवा पतीकडून त्रास असल्याचे हे अर्ज आहेत. कोरोना संसर्गाच्या नियमांमुळे कुणाला समेटसाठी अद्याप बोलविले गेले नसल्याचेही समोर आले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर झालेले लॉकडाऊन आणि लागू केलेली संचारबंदी यामुळे राजापासून रंकार्पयत सर्वच घरातच थांबले आहेत. कामधंदे बंद आहेत. नोकरदारांना वर्क फ्रॉम होम दिले गेले आहे. घरातच राहून कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन केले गेले आहे. त्यामुळे प्रत्येकजण कुटूंबासमवेत वेळ घालवू लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर ‘कुटूंबवत्सल’चा ट्रेण्ड असलेले फोटो मोठय़ा प्रमाणावर शेअर होऊ लागले. ते पाहून कुटूंबांमधील व्यक्तींमध्ये  प्रेम आणि जिव्हाळा अधीकच वृंदीगत झाल्याचे       चित्र असतांना दुसरीकडे मात्र याच काळात महिलांवरील कौटूंबिक अत्याचारांचे प्रमाण कायम राहिल्याचेही समोर येत  आहे. तक्रारींची सरासरी कायम लॉकडाऊनमुळे घराघरात कुटूंब एकत्र वेळ घालविण्यात रंगलेले असतांना दुसरीकडे सासूकडून सुनेला त्रास, पतीकडून प}ीला त्रास, कुठे चारित्र्याचा संशय तर कुठे पैशांसाठी महिलेला मारहाण असे प्रकार देखील घडत आहेत. पोलीस दलाच्या महिला सेलकडे गेल्या 19 दिवसात 11 तक्रारी अर्ज प्राप्त झाल्या आहेत. या सेलकडे महिन्याला सरासरी 25 तक्रारी अर्ज येतात. त्यामुळे सर्वसामान्य परिस्थिती असतांना महिन्याला जेवढय़ा तक्रारी येतात तेवढय़ाच सरासरी तक्रारी लॉकडाऊनच्या काळात देखील आल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देखील घरगुती हिंसाचाराला महिला बळी पडत असल्याचे चित्र आहे. समुपदेशन थांबलेमहिला सेलकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर सेलकडून तक्रारदार महिला व आरोप असलेल्या लोकांना बोलविले जाते. त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी त्यांचे समुपदेशन केले जाते. यासाठी महिला पोलीस आणि त्यांच्यातील समुपदेशक तक्रारदार आणि त्रास देणारे यांना सर्वच बाजूने समजविण्याचा प्रय}ात असतात. त्यातून अनेकांचे संसार देखील वाचल्याचे अनेक उदाहरणे आहेत. गुन्हा दाखल होऊ नये, संसार तुटू नये ही तळमळ या सेलमधील महिला कर्मचा:यांची असते. परंतु जर दोन्हीकडील मंडळी ऐकण्याच्या तयारीत नसतील तर मात्र गुन्हा दाखल करण्यास त्यांना मोकळीक दिली जाते. लॉकडाऊन तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावामुळे सध्या कुणालाही समुपदेशनासाठी बोलविण्यात आलेले नाही. त्यामुळे या सर्व 11 अर्जावर आता लॉकडाऊन उठल्यानंतरच समुपदेशन बाबतचा निर्णय होणार आहे. समाजाची मानसिकता कधी बदलणार.. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले आहे. आता जग बदलत असले तरी मानसिकता बदलण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरदार, व्यावसायिक पुरुषांना सुट्टी आहे. परंतु घरातील महिलांचे काम मात्र कमी झाले नाही. या काळात महिलांवरील कामाचा ताण अधीकच वाढल्याचेही एका सव्र्हेक्षणात पुढे आले आहे. त्यातच कुटूंबाअंतर्गत होणारे मानसिक आणि शाररिक अत्याचार कायम आहेत. महिला सेलकडे आलेला आकडा हा प्रातिनिधीक स्वरूपाचा आहे. अनेकजण अत्याचार सहन करून गप्प राहत असतीलही..ते चित्र मात्र पुढे येत नाही.