नंदुरबारात वाईन शॅाप फोडून दारूची चोरी,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:55+5:302021-05-08T04:31:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील भर वस्तीतील वाईन शॅाप फोडून चोरट्यांनी तब्बल चार लाख ९४ हजार ४१२ रुपयांची ...

Wine shop burglary in Nandurbar | नंदुरबारात वाईन शॅाप फोडून दारूची चोरी,

नंदुरबारात वाईन शॅाप फोडून दारूची चोरी,

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : शहरातील भर वस्तीतील वाईन शॅाप फोडून चोरट्यांनी तब्बल चार लाख ९४ हजार ४१२ रुपयांची विदेशी दारू लंपास केल्याची घटना ६ मे रोजी पहाटे घडली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबारातील गिरिविहार गेट भागात मोरे वाईन शॅाप नावाचे देशी व विदेशी दारू विक्रीचे दुकान आहे. या दुकानाच्या वरील मजल्याचा पत्रा उचकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील विदेशी दारू चोरून नेली. एकूण ७७ खोके चोरट्यांनी लंपास केले. त्यांची किंमत चार लाख ९४ हजार ४१२ रुपये इतकी आहे.

सद्या संचारबंदी असल्यामुळे दारू विक्रीची दुकाने बंदच आहेत. ती संधी साधून चोरट्यांनी हातसफाई केल्याचे दिसून आले. पहाटे ही घटना लक्षात आल्यावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी दुकानाच्या वरच्या मजल्यावरील पत्रा उचकवून चोरी केल्याचे दिसून आले.

याबाबत दुकानाचे मॅनेजर मुकेश चंद्रकांत होळकर यांनी फिर्याद दिल्याने उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार प्रशांत राठोड करीत आहेत.

Web Title: Wine shop burglary in Nandurbar