शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील बेघरांचे स्वप्न कधी पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत सर्वांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र सातपुड्यातील अतिदुर्गम भागात भेट दिल्यानंतर हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता कोसोदूर असल्याचे दिसून येते. येथील अनेक कुटूंब अद्यापही गवताच्या छताखाली वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पक्क्या घराचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार हा प्रश्न कायम आहे.सातपुड्यातील एकत्रित टोकावरचा नेमका भाग म्हणजे तोरणमाळकडील आहे. या ठिकाणाच्या पलीकडे उत्तरेत मध्यप्रदेश आणि पूर्वेस गुजरात राज्याची सीमा लागलेली आहे. चारही बाजूने घनदाट जंगल व उंच उंच पहाड, खोल दऱ्यांनी या परिसराला व्यापले आहे.सहा ते सात किमीचा मोकळा परिसर असलेल्या या टापूवर लोकवस्ती कशी वसली असेल याची कल्पना केली म्हणजे आश्चर्य वाटते. काही स्थानिक लोकांच्या सांगण्यावरून वन संपत्ती गोळा करण्यासाठी वन वन भटकणारा आदिवासी समाजाचा घनदाट जंगलात व नदी खोºयात टोळीचा वावर असायचा. कदाचित बन उपज गोळा करून आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी आदिवासी लोकांची टोळी या भागात गेली असावी.हा भूभाग इतर लोकवस्तीपासून दूर असल्याने त्यांना सूर्यास्तापूर्वी परत जाणे शक्य न झाल्यामुळे त्या लोकांच्या टोळीने येथील मोकळ्या भूभागावर आपला डेरा स्थापन केला असावा. कालांतराने येथे या टोळीतील कुटूंब विस्तारले आणि वस्ती निर्माण झाली. आधी काळापासून ज्या मूलभूत गरजासाठी लोकांना वन वन भटकावे लागत होते. येथील पाचही गावांमध्ये एकही पक्के घर दिसून आले नाही. येथील बहुतेक घरे मातीची व कौलारू छताची आहेत. त्यातच ४० टक्के घरे फक्त बांबू आणि गवताच्या छताचे तसेच बांबूच्या भिंती असलेले दिसून येतात. या गावामध्ये अनेक कुटुंबाना साधे कौलारू घरे सुध्दा नशीबी नाही तर मग पक्के घर कधी हा मोठा प्रश्न निर्माण होता आहे. मागील ४० वर्षांपासून केंद्र शासनाची केंद्र शासनाची आवास योजना सुरू असून, सुध्दा एवढ्या वर्षात येथील एकाही कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. ही घरकुल योजना गावांपर्यंत अद्यापपर्यंत पोहोचली नसल्याचे दिसून येत आहे.