शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या बजेटने मला काय दिले रे भाऊ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महागाई कमी करण्यासाठी ठोस असे काहीही नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महागाई कमी करण्यासाठी ठोस असे काहीही नाही. इंधनाचे वाढते दराबाबतही उपाययोजनांचा अभाव असल्याचे दिसून येत असल्याचे  अनेकांनी सांगितले. दुसरीकडे कोरोना आणि लॅाकडाऊन यात भरडली गेलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी घेतलेले काही निर्णय स्वागर्ताह असल्याच्याही प्रतिक्रिया उमटल्या.केंद्रीय अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. वाढती महागाई, कोरोनामुळे रोजगार गेलेले कामगार, बंद पडलेले उद्योग याबाबत ठोस अशी उपाययोजना अपेक्षीत होती मात्र ती दिसून आली नाही असे अनेकांनी सांगितले. वन नेशन वन कार्ड योजना चांगली असून आयकराबाबतची सूट या बाबी दिलासा देणाऱ्या आहेत. जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था भक्कम राहावी यासाठी केलेेल्या प्रयत्नांचे स्वागत झाले. 

बसस्थानकबसस्थानक परिसरात कानोसा घेतला असता अनेकांनी वाढत्या इंधनदराबाबत नाराजी व्यक्त केली. यामुळे पुढील काळात बसभाडे वाढण्याची भिती आहेच. खाजगी वाहन इंधन दरामुळे परवडत नाही. इंधन दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याची अपेक्षा व्यक्त झाली.

रेल्वेस्थानकरेल्वे प्रवाशांनी आजच्या बजेटबाबत संमिश्र प्रतिक्रीया व्यक्त केली. खाजगी रेल्वेचा प्रयोग चांगला असला तरी त्यावर सरकारचे नियंत्रण हवे. आपल्या भागासाठी नवीन काहीही नसल्यामुळेही काहींनी नाराजी व्यक्त केली. 

वाढत्या महागाईने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. महिना सरता सरता नाकीनऊ येतात. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेटमध्ये ठोस निर्णय आवश्यक होता, तो दिसून येत नाही.-संगिता पाटील, गृहिणी.

कोरोना काळात लहान व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे. सहजरित्या कर्ज मिळण्यासाठी आवश्यक तरतूद होणे आवश्यक होते, मात्र ते दिसून येत नाही. त्यामुळे पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागेल.-गणेश भामरे, किराणा दुकानदार.

कोरोना काळात गेलेला रोजगार आणि कमी झालेले पगार पुर्ववत होण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदीची अपेक्षा होती. परंतु उद्योजकांना सवलती देतांना कामगारांना वा-यावर सोडलेले दिसत आहे.-सुनील मिस्तरी, खाजगी नोकरदार.

आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत युवकांना स्वयंरोजगार देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारीवर मात करता येईल व युवकांना दिलासा मिळेल.                                                                                                                                               -भूषण पाटील, युवक.

कर स्लॅबची पुनर्रचना नसणे, कर सवलतींबाबत फारसा आशादायक निर्णय नसल्याने व्यापारी वर्गात कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसाय बुडाला आहे.-जगदीशभाई जैन, व्यापारी.

पेट्रोलचे व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्या तुलनेत भाडेवाढ केली तर प्रवासी नाराज होतात. इंधन दरवाढ कमी करावी. छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा.-सुरेश शिंपी, ॲाटोचालक.

शेतीमालाला हमी भावाची तरतूद, शेतीसाठी भरीव तरतूद, कृषी कायद्यांची अंमलबजावणी यासह इतर बाबींचा समावेशाने समाधान आहे. परंतु खत, किटकनाशके यांच्या किंमतीवर नियंत्रण हवे.-भारत पाटील, शेतकरी.

इंधन दरवाढ होत असतांना दुसरीकडे खाजगीकरणाचाही घाट घातला जात आहे. त्यामुळे उद्योग, व्यवसायीक जेरीस येत आहे. खाजगी कंपनीमालक मनमानी करणार, शासनाचा धाक असला पाहिजे. -जतीन पटेल, इंधन विक्रेता.

७५ वर्ष वयावरील ज्येष्ठांना कर सवलत देण्यात आली आहे. इतरही काही चांगल्या योजना या बजेटमध्ये आहेत. त्यामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे. उतारवयातील आयुष्यात समाधान आहे.-पी.के.पाटील, ज्येष्ठ नागरिक.

लहान विक्रेत्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेसाठी भरघोष निधीची तरतूद असली तरी लघु कर्जांची मर्यादा वाढविणे आणि त्यावरील व्याज कमी करणे आवश्यक आहे. -तुकाराम माळी, भाजीपाला विक्रेता.