घरी आलेल्या पाहुण्यांचे कैरीच्या सरबताने स्वागत

By Admin | Updated: May 15, 2017 12:45 IST2017-05-15T12:45:30+5:302017-05-15T12:45:30+5:30

आलेल्या पाहुण्यांकडूनही या खातीरदारीला प्रतिसाद देण्यात येत आह़े

Welcome to the Carry Souvenir guests | घरी आलेल्या पाहुण्यांचे कैरीच्या सरबताने स्वागत

घरी आलेल्या पाहुण्यांचे कैरीच्या सरबताने स्वागत

ऑनलाइन लोकमत

रांझणी, जि. नंदुरबार, दि. 15 -  तळोदा तालुक्यातील सातपुडा परिसरातील विविध गावात सध्या घरी आलेल्या पाहुण्यांचे कैरीच्या सरबताने स्वागत केले जात आह़े आलेल्या पाहुण्यांकडूनही  या खातीरदारीला प्रतिसाद देण्यात येत आह़े
परिसरात आंब्याची झाडे मोठय़ा संख्येने आहेत. त्यामुळे उन्हाच्या दाहकतेपासून काही प्रमाणात आराम मिळावा यासाठी ग्रामस्थांकडून कैरीपासून तयार करण्यात येत असलेले शीतपेय बनविण्याकडे अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांकडून कैरी तोडून  बारीक करण्यात येते. त्याला गार पाण्यात           टाकण्यात येऊन त्यानंतर मीठ, साखर गरजेनुसार टाकण्यात येते व ते गाळून  रस तयार करण्यात येतो. सध्या जिल्ह्यात  उकाडा मोठय़ा प्रमाणात जाणवत आह़े त्यामुळे या नैसर्गिक पेयाच्या माध्यमातून शरीराला गारेगार ठेवण्याची ही शक्कल अनेकांना भावत आह़े

Web Title: Welcome to the Carry Souvenir guests