शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारला आदर्श जिल्हा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 11:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : देशातील 115 आदिवासी जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून घोषीत करून त्यांच्या विकासाचे नियंत्रण स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे. या जिल्ह्यात नंदुरबारचाही समावेश असून हा जिल्हा देशातील सर्वात आदर्श जिल्हा करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नवापूर येथे केली.नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भरत गावीत यांच्या प्रचारासाठी शनिवारी अमित शहा यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, खासदार डॉ.हिना गावीत, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सरचिटणीस राजेंद्र गावीत, कुवरसिंग वळवी, अनिल वसावे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी सांगितले, आपण नवापूर येथे सभा स्वत:हून मागून घेतली. कारण या ठिकाणी आजवर कधीही भाजपचे उमेदवार विजयी झाले नाहीत. परंतु या निवडणुकीपासून परिवर्तन निश्चित होणार असून नवापूूरात भाजपचेच उमेदवार भरत गावीत हे विजयी होऊन येथे प्रथमच कमळ फुलवतील. केंद्राप्रमाणेच राज्यातही एक तृतियांशचे बहुमताचे सरकार निश्चित येणार असून दोन्ही ठिकाणी पक्षाचे सरकार राहिल्यास विकासाला अधीक वेग देता येणार आहे. 1955 मध्ये याबाबतचा अहवाल तेंव्हा च्या सरकारला देण्यात आला होता. त्यात ओबीसींवर अन्याय होत असल्याचे म्हटले होते. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार येताच त्यावर विचार झाला व ओबीसींचा सन्मानाच्या योजना सुरू केल्या. मंत्रालयात स्वतंत्र आदिवासी कल्याण विभाग सुरू केला.  केंद्रातील आघाडी सरकारने राज्याच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षापूर्वी जेवढा निधी दिला होता त्याच्या चार पटीने निधी नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात राज्याला दिला आहे. त्यामुळे भाजप सरकारच ख:या अर्थाने समाजातील सर्व घटकांचा विकास करणारे सरकार असल्याने या सरकारचा पाठीशी जनतेने राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या 30 मिनिटांच्या भाषणात अमित शहा यांनी केंद्र आणि राज्य शासनाने गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी राबविलेल्या योजनांची माहितीही दिली.