शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पाणी स्त्रोतच पाण्याखाली जिओ टॅगिंगसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीसाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक पाण्याचे स्त्रोत हे नदी, नाल्यांमध्ये तसेच धरणांच्या परिसरात आहेत. अशा ठिकाणी अद्यापही पाण्याचा प्रवाह किंवा पाणी साठलेले असल्यामुळे कर्मचा:यांना जीव धोक्यात घालून जिओ टॅगिंग करावे लागत असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे मॅपींग करण्याची मोहिम सध्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासणीची मोहिम सध्या सुरू करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पहाता पाणी पुरवठा योजनांची संख्या मर्यादीत आहे. त्यामुळे विहिरी, कुपनलिका आणि नाले व झ:यांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जिल्ह्यातील सर्वच पाणी स्त्रोतांची तपासणी करून त्यातील पाणी नमुने घेत त्यांचे रासायनिक पृथ:करण केले जात असते. त्यानुसार संबधीत पाण्याचे स्त्रोत हे पिण्यालायक आहे किंवा नाही हे ठरविले जाते. त्यासाठी मात्र प्रत्येक पाणी स्त्रोताची जियोफेनिसिनींग करणे आवश्यक असते. सध्या ते काम सुरू करण्यात आले आहे. त्याला गती देखील देण्यात आली आहे. गेल्या वर्षी या कामात नंदुरबार जिल्हा राज्यात अग्रेसर होता. यंदा देखील जिल्हा अव्वल राहण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न सुरू आहे.अनेक अडचणीजिल्ह्यातील दोन तालुके संपुर्णपणे डोंगराळ आणि द:याखो:यांचे आहेत. अशा ठिकाणच्या पाणी स्त्रोतांचे जिओ फिनिसिनिंग करण्याचे मोठे दिव्य सध्या कर्मचा:यांसमोर आहे. अनेक ठिकाणी कमरेएवढय़ा पाण्यातून जात पाणी स्त्रोत असलेल्या विहिरी आणि कुपनलिकांर्पयत पोहचावे लागत आहे. काही वेळा स्थानिकांची मदत घ्यावी लागत आहे तर काही वेळा स्वत: कर्मचा:यांनाच जीव धोक्यात घालत जावे लागत आहे. साडेआठ हजार स्त्रोतजिल्ह्यात 591 ग्रामपंचायतीअसून एकुण साडेआठ हजारापेक्षा अधीक पाणी स्त्रोत आहेत. ज्या ठिकाणाहून किंवा स्त्रोताहून गाव, पाडय़ातील नागरिक पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात ते अधिकृत स्त्रोत मानले जाते. त्यामुळे अशा स्त्रोतांची गाव, पाडे आणि द:याखो:यात जावून निश्चिती करण्यात आली. त्यांची एकुण संख्या 8,644 इतकी आहे. या सर्व स्त्रोतांचे अक्षांश, रेखांश निश्चिती करून त्याचे डिजीटलायङोशन करण्यात येत आहे. अॅप व वेबसाईटद्वारे ते सहज पहाता येत असते. हंगामी, बारमाही व कायमस्वरूपी बंद असलेल्या स्त्रोतांचे सव्रेक्षण करण्यात येत आहे. इतकेच नाही तर स्त्रोतांपासून ते जलकुंभार्पयत गेलेल्या वितरण नलीकेचे सव्रेक्षण करण्यात  आहे.कुठे होडीचा तर कुठे दोरचा घ्यावा लागतो आसरापाणी नमुने तपासणी आणि जिओ टॅगिंग करण्यासाठी जाणा:या कर्मचा:यांना कुठे होडीचा तर कुठे दोर लावून पाण्यातून पाणी स्त्रोतार्पयत जाण्याची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. धनपूर येथे एक पाण्याचे स्त्रोत धरण क्षेत्रात होते. तेथील हातपंपातून उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थ पाणी पीत होते. परंतु धनपूर धरण यंदा काठोकाठ भरल्याने हे स्त्रोत पाण्याखाली आहे. जिओ टॅगिंग करतांना तेथे होडीद्वारे जावे लागले. अशीच स्थिती नागसर येथील होती. नागसर धरणात या गावाच्या स्त्रोताच्या विहिरी पाण्यात आल्याने तेथेही स्थानिकांच्या मदतीने कर्मचारी तथा जिल्हातज्ज्ञ नितीन पाटील व अजरून कडवे यांनी दोर बांधून पाण्यात उतरले होते. अशीच स्थिती जिल्ह्यातील अनेक ठिकाणची तथा दुर्गम भागातील पाणी स्त्रोतांची    आहे. 

जिओ टॅगिंग करतांनाच पाणी नमुने देखील घेतले जात आहेत. मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात असे दोन वेळा पाणी नमुने घेवून त्यांची तपासणी केली जाते. 31 डिसेंबर र्पयत सर्व साडेआठ हजार पाणी स्त्रोतांचे टॅगिंग करून त्यातील पाणी नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. परंतु पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कर्मचा:यांनी मुदतीआधीच संपुर्ण काम करण्याचे नियोजन करून ठेवले आहे. या विभागाच्या नव्याने आलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी कर्मचा:यांना प्रोत्साहीत केले असून गेल्या वर्षाप्रमाणेच यंदा देखील या कामात जिल्हा अव्वल राहील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.