शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात नंदुरबारवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात 30 ऑगस्टर्पयत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात 30 ऑगस्टर्पयत पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. जर पावसाची स्थिती अशीच कायम राहिली तर मोठे संकट निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेता 1 ऑगस्टपासून शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.आमदार रघुवंशी यांनी सांगितले, गेल्यावर्षी पजर्न्यमान कमी झाल्याने शिवण नदीवरील विरचक प्रकल्पात अपेक्षीत पाणीसाठा झाला नव्हता. अवघ्या 35 टक्के पाणीसाठा झाला होता. आज अखेर केवळ डेड स्टॉक शिल्लक आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरी प्रकल्पात पाणीसाठा होऊ शकलेला नाही. यापुढेही परिस्थिती कशी राहील याची शाश्वती नाही. सद्य स्थितीत केवळ 30 ऑगस्टर्पयत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पालिकेला नाईलाजाने आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे किमान पाणी साठा सप्टेंबर महिन्याच्या मध्यर्पयत तरी पुरेल. त्या काळात पाऊस चांगला आला आणि पाणीसाठा वाढला तर शहरवासीयांच्या सुदैवाने ती चांगली बाब ठरणार आहे. एकदिवसाआड पाणी पुरवठा करतांना नागरिकांनी पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील आमदार रघुवंशी यांनी केले आहे.सौर उर्जा प्रकल्पास मान्यतानंदुरबार शहरासाठी सौर उर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव डीपीडीसीकडे सादर करण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. यामुळे पालिकेचे जवळपास 18 लाख रुपये वीज बिल वाचणार आहे. लवकरच या प्रकल्पाला चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.घरकुल नियमानुसारचपालिकेने राबविलेल्या घरकुल योजनेत लाभार्थ्ीवर अन्याय  झाल्याची बाब संसदेत खासदार डॉ.हिना गावीत यांनी मांडली. त्यावर बोलतांना आमदार रघुवंशी म्हणाले, 876 घरकुले असतांना 650 अर्ज आले. अर्ज केलेल्या सर्वाना घरकुले लॉटरी पद्धतीने देण्यात आली. त्यासाठी शासनाने प्रांताधिकारी यांना   प्राधिकृत  अधिकारी नेमले होते. असे सर्व असतांना अन्याय कसा झाला     हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय जी दीडशे घरे शिल्लक आहेत ती देखील वाटप करण्यासाठी लवकरच जाहीर सुचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दादागिरी सहन करणार नाहीपालिकेत येवून तोडफोड करून कुणी कामे मंजुर करून घेण्याच्या भ्रमात असतील तर तो सहन केला जाणार नाही. पालिकेने गेल्या दीड वर्षात सर्वाधिक कामे ही विरोधकांच्या वॉर्डातच केली आहेत. हे आपण कागदपत्रानिशी सिद्ध करून दाखविण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोफत रोगनिदान शिबिरस्व.बटेसिंह भैय्या रघुवंशी यांच्या जयंतीनिमित्त 13 ऑगस्ट रोजी मोफत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंत विद्यालयाच्या मैदानावर हे शिबिर होणार आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र परिवार आणि एसएमबीटी हॉस्पीटल, घोटी यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.