शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला असून, दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा तालुक्यातील वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला असून, दुपारी 12 वाजल्यापासून एकही जबाबदार अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.याबाबत असे की, शहादा तालुक्यातील वडाळी येथील भिका माळी यांना अचानक झटका आल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्यांना तत्काळ दाखल केले असता. त्या ठिकाणी कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी आढळून आला नाही. त्यामुळे रुग्णाला एक तास ताटकळत बसावे लागले. हे प्राथमिक आरोग्य केंद्र मदर पी.एच.सी. म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. मात्र गेल्या आठ ते दहा महिन्यापासून या आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार वेळोवेळी चव्हाटय़ावर आला आहे. यास येथील वैद्यकीय अधिकारी जबादार आहे. या केंद्रात औषधींचा नेहमीच तुटवडा असतो. तसेच कर्मचा:यांची कामाची पद्धत अतिशय उर्मट आहे. आलेल्या रुग्णांशी उर्मटपणे वागण्यात कर्मचा:यांची हातोटी आहे. या आरोग्य केंद्राशी 20 ते 22 खेडय़ांचा संपर्क असून, याठिकाणी कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी  आवश्यक असताना मात्र या आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे तालुक्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. त्यामुळे संबंधित अधिका:यांची कर्मचा:यांवर कुठल्याही प्रकारे वचक राहिलेला नाही. दररोज दुपारी आरोग्य केंद्रात शुकशुकाट दिसून येतो. याबाबत अनेकदा संबंधितांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा कुठलाही उपयोग झाल्या नसल्याचे बोलले जात आहे.

वडाळी येथे दर बुधवारी आठवडे बाजार असल्याने या दिवशी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, कर्मचा:यांची उपस्थिती आवश्यक असताना सुद्धा कोणीही दिसून आले नाही. या आरोग्य केंद्रात रुग्णांची नेहमीच हेळसांड होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा नेहमीच रोष असतो.