शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तुळाजा येथील नागरिकांना आंदोलन छेडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

ग्रामपंचायतीचा ठराव नाही सदर अतिक्रमणधारकांचा तेथील पुनर्वसनासाठी महसूल विभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी तुळजा ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला होता. परंतु ...

ग्रामपंचायतीचा ठराव नाही

सदर अतिक्रमणधारकांचा तेथील पुनर्वसनासाठी महसूल विभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी तुळजा ग्रामपंचायतीकडून ठराव मागितला होता. परंतु ग्रामपंचायतीने तत्सम ठराव दिलेला नाही. तरीही हे अतिक्रमणधारक तुळाजा गावात येतात. त्यामुळे वनविभाग व महसूल प्रशासनाने संयुक्तिक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वनविभागाने टाकली नांगी

या अतिक्रमणधारकांनी ज्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केले आहे. ती जमीन वनविभागाच्या मालकीची आहे. तरीही वनविभाग त्यांना तेथून उठवण्याबाबत उदासीन भूमिका घेत आहे. एकप्रकारे त्यांचा पुढे वनविभागाने अक्षरशः नांगीच टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. साहजिकच अतिक्रमणधारकांचे फावले आहे. त्यामुळेच त्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही. याबाबत गावकऱ्यांनी सातत्याने प्रत्यक्ष अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मात्र अधिकारी तेवढ्या पुरता आम्हास खोटे आश्वासन देतात. एवढेच नव्हे जिल्हा प्रशासनास सुध्दा काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले आहे. त्याचीही दखल आजपावेतो दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

वनविभागाच्या ज्या कूप नंबरमध्ये राहणाऱ्या त्या नागरिकांनी वन अतिक्रमण दावे दाखल केले असून ते प्रलंबित आहेत. त्याबाबत चौकशी करीत आहोत. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल. - नीलेश रोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कार्यालय तळोदा.

गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर संबंधितांच्या वन हद्दीतील अतिक्रमणबाबत चौकशी करण्याचे आदेश तळोदा वन परिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे. अहवाल प्राप्त झाल्याबरोबर पुढील कार्यवाही केली जाईल. - पी.के. बागूल, उपवन संरक्षक, मवासी वनविभाग तळोदा