तीन वर्षाच्या मुलासह पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:45 PM2020-04-03T12:45:47+5:302020-04-03T12:45:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन झाल्याने जिल्ह्यासह अनेक ठिकाणी राहणारे अनेक कुटुंब आपापल्या गावी मिळेल ...

Walking distance with a three year old | तीन वर्षाच्या मुलासह पायी प्रवास

तीन वर्षाच्या मुलासह पायी प्रवास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन झाल्याने जिल्ह्यासह अनेक ठिकाणी राहणारे अनेक कुटुंब आपापल्या गावी मिळेल त्या वाहनाने अथवा पायीच घरी परतत आहेत. डेडीयापाडा (गुजरात) ते शहादा असा पायी प्रवास करीत एक गरीब कुटुंब तीन वर्षाच्या मुलासह शहाद्यात पोहोचले.
मध्य प्रदेशातील उमरखली (खरगोन) येथील टिकाराम मानकर व त्याची पत्नी परिता मानकर हे रोजगारासाठी डेडीयापाडा येथे गेले होते. मुलासाठी मागितलेला उतरण्यासाठी पैशांची गरज असल्याने डेडियापाडा येथे काही दिवस त्यांनी कामाची शोधाशोध केली. थोड्या दिवसानंतर विटांच्या पजावावर काम करण्याचे त्यांनी ठरवले. सर्व काही सुरळीत होईल या आशेत असतानाच देशात कोरोना विषाणूने थैमान घातले. त्यातच देशभरात लॉकडाऊन झाल्याने रोजगार कधी उपलब्ध होईल याची शाश्वती नसल्याने व खिशात पैसे नसल्याने उपासमारीचा सामना या तिघांना करावा लागत होता. प्रवासासाठी सुविधा नसल्याने त्यांनी पायी प्रवास करीत शहादा गाठले. शहादा येथे आल्यानंतर हे कुटुंब शासकीय विश्रामगृह परिसरात बसले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे यांच्यावर लक्ष गेले. विचारपूस केल्यानंतर डेडियापाडापासून पायीच आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर मुख्य अभियंता जे.एस. कादरी, कमलाकर साळुंखे, सचिन पगारे यांनी साहित्य उपलब्ध करून त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर त्यांना शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत राहण्यासाठी व्यवस्था करून जेवण व इतर गोष्टींची सुविधा करण्यात आली. ही बाब स्वयंसेवी संस्थांना माहित पडल्याने त्यांच्याकडूनही सोय करण्यात येत आहे. या कुटुंबाची पुन्हा आरोग्य तपासणी करून त्यांच्या मूळ गावी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Walking distance with a three year old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.