शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या सॅनिटायझरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

शेतकरी करताहेत पाण्याची मागणी नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात उन्हाळी पिकांसाठी जलसंपदा विभागाने पाणी देण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील ...

शेतकरी करताहेत पाण्याची मागणी

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागात उन्हाळी पिकांसाठी जलसंपदा विभागाने पाणी देण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील काही प्रकल्पातून पाटाद्वारे तसेच माेटारी टाकून पाणी उचलणे शक्य आहे. या भागातील शेतकरी सध्या विभागाकडे अर्ज करुन पाठपुरावा करत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील झाड तोडले

नंदुरबार : तालुक्यातील आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या बांधकाम सुरु आहे. शासनाकडून ठेकेदार नियुक्त करुन इमारत व निवासस्थानांचे बांधकाम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान संबंधित ठेकेदाराने येथील डेरेदार असा वृक्ष तोडून टाकल्याची माहिती समाेर आली आहे. हा वृक्ष तोडल्यानंतर त्याठिकाणी किमान पाच झाडे लावण्याची अपेक्षा असतानाही कार्यवाही झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंस्त्र प्राण्यांचा संचार

बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद परिसरात पुन्हा बिबट्या दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील शेतशिवारात हा बिबट्या दिसून आल्याने चिंता वाढल्या आहेत. उन्हाळा सुरु झाल्याने वन्यप्राणी वनातून शेतशिवारातील पाणीसाठ्यांकडे धाव घेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टरबूजांची तोडणी

रांझणी : तळोदा तालुक्यातील विविध भागात लागवड करण्यात आलेल्या टरबुजांची तोडणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांनी तीन महिन्यांपूर्वी लागवडीला सुरुवात करत पिकांचे संगोपन केले होते. यातून सर्वच ठिकाणी चांगले पीक आल्याने तोडणी सुरु झाली आहे. व्यापारी बांधावर खरेदी करत आहेत.

आवास योजनेच्या लाभार्थींना अडचणी

नंदुरबार : जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलांचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थी त्रस्त आहेत. यातही काही लाभार्थींना ग्रामसभेने ठराव देऊनही त्यांची नावे अद्याप यादीत आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेकांनी सुरु केलेेली घरांची कामे थांबली आहे. नंदुरबार, शहादा व धडगाव तालुक्यात या अडचणी अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.

पेट्रोल चोरट्यांवर लक्ष देण्याची गरज

नंदुरबार : एकीकडे पेट्रोलचे दर वाढल्याने दुसरीकडे पेट्रोल चोरीचेही प्रकार होत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी पेट्रोल चोरी झाल्याचे समोर आले आहे. शहरासोबतच लगतच्या वाघोदा, पातोंडा, होळ तर्फे हवेली शिवार आणि दुधाळे शिवारातील वसाहतींमधून दुचाकींमधून पेट्रोल लांबवण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती देण्यात येत आहे.

बसफेऱ्या वाढवा

शहादा : धडगाव येथून शहादा बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दुपारच्या वेळी बसेस नसल्याने प्रवासी ताटकळून असतात. यातून कामानिमित्त धडगावकडे जाणाऱ्यांचे हाल होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. बसेस वाढल्यास प्रवासी संख्या वाढणार आहे.

कांदा आवक वाढली

नंदुरबार : बाजार समितीच्या मार्केट यार्डात कांदा आवक वाढली आहे. ग्रामीण भागात पांढरा कांदाही विक्रीसाठी आणला जात असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी येणारा खराब आणि छोटा कांदा बाजारात आणणे बंद झाले असून चांगल्या दर्जाचा कांदा येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

चारा साठवण

धडगाव : दुर्गम भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्याने चारा साठवण करण्याची तयारी सुरु झाली आहे. घरोघरी कापण्यात आलेला ज्वारीचा कडबा झोपडीसारखा उंचावर रचून त्याचा साठा केला जाता. उन्हाळ्यात हिरवा चारा कमी झाल्यानंतर गुरांना कोरडा कडबा देत त्यांचे संगोपन करण्यात येते.

स्वच्छतेची मागणी

अक्कलकुवा : शहरातील विविध भागात कचरा पडून आहे. यामुळे येणाऱ्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील बाजारपेठ व शाळांच्या आसपासही कचरा पडून आहे. संबधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.