शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाशी नाळ जोडणारी वाघदेव पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आधुनिकतेत जुन्या व आदर्श परंपरा लुप्त होत असल्या तरी सातपुड्यात जल, जंगल, हवा व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आधुनिकतेत जुन्या व आदर्श परंपरा लुप्त होत असल्या तरी सातपुड्यात जल, जंगल, हवा व सुर्यप्रकाश पूजेची प्रथा आजही टिकून आहे. निसर्गाशी संबंधित घटकांची पूजा केली जात असल्यामुळे सातपुड्यातील आदिवासी संस्कृती निसर्गाशी नाळ जुळणारी ठरत आहे.जागतिकीकरणात होणाऱ्या विकासामुळे प्रत्येक समाजातील जुन्या रुढी लोप पावत आहे. आदर्श असूनही आताची मुले या परंपरांकडे फारसे वळत नाही. त्यामुळे जुन्या रुढी व परंपरांचे संवर्धन होण्याऐवजी अस्ताला आल्या आहे. परंतु या बाबीला धडगाव व मोलगीचा भाग काही अंशी अपवाद ठरत आहे. मुळात आदिवासी संस्कृती निसर्गाशी मिळती-जुळती असून ती पर्यावरणपूरक आहे. राहणीमानासह अन्न, वस्त्र, निवारा या सर्व बाबी निसर्गावर आधारित आहेत. शासनाच्या घरकुल योजनांमुळे उभारलेली काही घरे वगळता या भागातील घरे पूर्णत: लाकडी असून त्याचा पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होत नाही. पटेल तसे घराची जागा, आकार व लाकूड बदलता येते. संसारोपयोगी साहित्यांमधील बहुतांश साहित्य हे बांबूपासून तयार केलेले आढळून येते. जंगलातील विविध प्रकारचा पाला, फुले व फळे वर्षभरातील खाद्यपदार्थ म्हणून साठवून ठेवले जात आहे.खाद्यसंस्कृतीसह तेथील आदिवासी बांधवांची कालगणना देखील सुर्य व चंद्रावरुन होत आहे. शिवाय निसर्गावर आधारित नावाने स्वतंत्र महिने देखील आहेत. या महिन्यांनुसार वेगवेगळे सण-उत्सव देखील साजरी होत आहे. या उत्सवात प्रामुख्याने वाघदेव, निलीचाराय, गावदेवती, नवाय, डोगरी दिवाली, आठीवटी, गावदिवाली, याहा मोगी माता यात्रा, ओली (होळी) या सण-उत्सवांचा समावेश होतो. याशिवाय खळेपूजन, दुठल, इंंदल या पूजांचाही उल्लेख करता येतो. हे सर्व उत्सव दरम्यान हवा, पाणी, अन्न, जंगल व सुर्यप्रकाश यांची पूजा केली जात असल्याने निसर्गावर आधारित पूजा असल्याचे म्हटले जात आहे.काही सण-उत्सव साजरे करताना ग्रामस्थांना पंगत देखील दिली जाते. या पंगतीसाठी लागणारे खर्च, अन्न, लाकुड व अन्य बाबी लोकसहभागातून उभारला जातो. सद्यस्थितीत धडगाव, मोलगी भागात गाव दिवाळी साजरी होत आहे. याची पंचमंडळीमार्फत काही आधीच तयारी सुरू होत आहे. पंगतीसाठी पर्यावरणाला बाधा ठरणाºया प्लॅस्टिक, थर्माकॉलपासून निर्मित पत्रावळींचा वापर केला जात नसून परंपरेनुसार सागाची पाने वापरली जात आहे. या पानांमुळे अन्नग्रहण करणाºयावर धोका ठरण्याऐवजी त्यातील औषधी गुणधर्म मिळत आहे. त्यामुळे ही बाब सुदृढ आरोग्यासाठी लाभदायक असून ही जीवनपद्धत अरोग्यासह पर्यावरणाचे रक्षण करणारी देखील ठरत आहे.

सातपुड्यात नैसर्गिक साधने वापरण्यास प्राधान्य देत आहे. घराबाहेर पडतांना प्लॅस्टिक बाटल्यांमध्ये पाणी नेण्याऐवजी मटक्याच्या आकारातील दुधी भोपळ्यापासून निर्मित भांड्यात (तुंबडी) पाणी नेण्याची प्रथा आहे. आज प्लॅस्टिकमुळे जागतिक संकटे निर्माण झाली आहे. तसे तुंबडीमुळे झाले नाही. अल्युमिनीअम, लोखंडी भांड्यांऐवजी मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जातो. हा स्वयंपाक कसदार व चवदार असल्याचे आढळून येते. याशिवाय बहुतांश भांडी, संसारोपयोगी साहित्य निसर्गावर आधारित असल्याने तापमानवाढीसारखे विनाशकारी संकटे टाळले जात आहे.