गाव पातळीवर स्वयंसेवक नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:16 PM2020-03-28T12:16:16+5:302020-03-28T12:16:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूच्या संसगार्बाबत अन्य जिल्ह्यातील अनुभव लक्षत घेता नियंत्रक अधिकाऱ्यांनी सहायक पथके तयार ठेवावीत ...

Volunteers will be appointed at village level | गाव पातळीवर स्वयंसेवक नेमणार

गाव पातळीवर स्वयंसेवक नेमणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना विषाणूच्या संसगार्बाबत अन्य जिल्ह्यातील अनुभव लक्षत घेता नियंत्रक अधिकाऱ्यांनी सहायक पथके तयार ठेवावीत व ऐनवेळच्या नियोजनासाठी तयार रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. दरम्यान, भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास गाव पातळीवर स्वयंसेवक नेमण्याची प्रक्रिया सुरू करावी अशा सुचनाही देण्यात आल्या.
सर्व क्षेत्रीय प्रमुख अधिकाऱ्यांना आणि जिल्हास्तरीय अधिकाºयांना त्यांच्या जबाबदाºयांबाबत माहिती देण्यात यावी. प्रत्येक अधिकाºयाकडे स्वतंत्र जबाबदारी सोपविण्यात यावी. या प्रक्रीयेत सहभागी सर्व अधिकाºयांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांच्याकडील नियोजन तयार ठेवावे व त्यानुसार आवश्यक साधनसामुग्रीचा आढावा घ्यावा. अधिकाºयांनी आपल्या क्षेत्रात सुरू असलेली वैद्यकीय तपासणी, क्वॉरंटाईन सुविधा, औषध फवारणी, जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता याची माहिती दैनंदिन स्वरुपात घ्यावी. या संपूर्ण प्रक्रीयेत अडचणी असल्यास त्या सोडिविण्यासाठी तात्काळ आवश्यक निर्णय घ्यावेत. जिल्हास्तरावरून सहकार्य आवश्यक असल्यास तसे नियंत्रण कक्षास कळवावे. नागरिकांना आवश्यक वस्तू व सेवा मिळण्यासाठी सहकार्य करताना कोरोनाबाबत प्रबोधनही करण्यात यावे. विशेषत: दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याबाबत आवाहन करावे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाºयांना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अशी परिस्थिती हाताळण्यासाठी गट विकास अधिकारी आणि नगर पालिकेच्या मुख्याधिकाºयांनी वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची यादी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दिले आहेत. स्वयंसेवक हा स्वेच्छेने आपत्कालीन कार्यात सहभागी होण्यास तयार असावा. त्याचे सर्वसाधारण आरोग्य चांगले असावे व वय ४५ पेक्षा अधिक नसावे. याद्या गावपातळीवर सरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीने तर नगर पालिका स्तरावर मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या स्वाक्षरीने ३० मार्च पर्यंत जमा कराव्यात असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मंगळ बाजारातील विक्रेत्यांचे स्थलांतर...
४नंदुरबारातील मंगळ बाजारातील भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता येथील विक्रेत्यांना विविध चौकात आणि रस्त्यांवर हलविण्यात आले आहे.
शुक्रवारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मंगळ बाजार, जळका बाजार आणि गांधी चौक या अरुंद ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना शहरातील वेगवेगळ्या मैदानात तसेच मोकळ्या जागेत स्थलांतरीत करण्यात आले.
याशिवाय विक्रेत्यांना वस्ती आणि कॉलनीत जाऊन विक्री करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. यामुळे एकाच ठिकाणी होणारी टळणार असून यामुळे विक्रीमध्ये देखील सुटसुटीतपणा राहणार आहे.
४मंगळ बाजारात पोलिसांची देखील मदत घेतली जात आहे. एकाच ठिकाणी जास्त विक्रेते उभे राहू नयेत यासाठी पोलीस संबधीतांना सुचना देत आहेत. काही वेळा कारवाई देखील करीत आहेत.

कृषीमाल वाहतुकीसाठी प्रमाणपत्र गरजेचे
शेतकरी व कृषी मालाचे व्यापारी यांना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाहतूकीसाठी अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्याचे अधिकार मंडळ कृषी अधिकाºयांना देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी आदेशाद्वारे त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी प्राधिकृत केले आहे.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हे तालुकानिहाय व मंडळ अधिकाºयांच्या जबाबदाºया निश्चित करतील व आवश्यक प्रमाणपत्र वितरणाचे नियोजन करतील.
प्रमाणपत्र वाटपात दिरंगाई किंवा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

बाहेरून आलेल्यांचे सर्वेक्षण सुरू...
बाहेरील राज्यातून अथवा देशातून आलेल्या नागरिकांचे घरी जाऊन प्रत्यक्ष भेटीद्वारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जिल्ह्यात संशयित व्यक्ती अथवा दवाखान्यात उपचार घेत असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्यात येणार आहे. अशा व्यक्तींनी विविध ठिकाणी दिलेल्या भेटी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती सर्वेक्षणाच्या माध्यमातून एकत्रित करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांची समन्वयक अधिकारी तर तहसीलदार उल्हास देवरे यांची सहाय्यक समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणातील माहिती शासनास सादर करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Volunteers will be appointed at village level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.