शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

बामखेडा ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त., येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला ...


लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा त.त., येथील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला नाशिक येथून शहादा येथील विलगीकरण कक्षात गुरुवारी दाखल करण्यात आले. तसेच या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील २७ लोकांना शहादा येथील मोहिदा रस्त्यावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यातील रुग्णाच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचीही गुरुवारी घरवापसी झाली.
सरपंच लीना चौधरी, पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी, ग्रामविकास अधिकारी पी.व्ही. बाविस्कर, आरोग्य सेविका अलका मराठे, मनोज चौधरी, संगणक चालक कैलास गवळे, प्रल्हाद कुलथे, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती या रुग्णाच्या कुटुंबाच्या स्वागतासाठी उपस्थित होते. या कुटुंबाला प्रशासनातर्फे पुढील आठवडाभर होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बामखेडा येथील रुग्णावर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात दुसऱ्या आजारावर उपचार सुरू असताना त्याची कोरोना चाचणीही घेण्यात आली. त्यात त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागातर्फे तपासणी करण्यात आली होती. आधी १६ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी कुटुंबातील ११ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. नंतर त्यामधील तीन डॉक्टर व दोन चालक असे उर्वरित लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचेही अहवाल निगेटव्ही आले आहेत. परंतु अजून एक किंवा दोन दिवस त्यांना शहादा येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे, असे समजते.
कोरोना रुग्णाची जिल्हावापसी
बामखेडा येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला नाशिक येथे उपचारादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला होता. त्यानंतर नाशिक येथील खाजगी दवाखान्यात कोरोनाचे उपचार सुरु होते. त्यांचा दुसरा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी सकाळी या रुग्णाला शहादा येथील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले. पुढील आठवडाभर तेथेच त्यांच्यावर उपचार सुरु राहतील, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.


बामखेडा त.त., ता.शहादा येथे गेल्या पाच दिवसांपासून सर्व गाव लॉकडाउन होते. परंतु सर्व व्यक्तींचे नमुने हे निगेटीव्ह आल्याने गावात काहीअंशी चिंतेचे वातावरण कमी झाले आहे. त्यामुळे गावातील किराणा दुकान, बँक, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शेती कामे आदी सर्व सोशल डिस्टस्टिंगचे पालन करीत सुरळीत सुरु करण्यात आली.